IIT Mumbai: आयआयटी विद्यार्थीनीचा कर्मचारी बाथरुममध्ये काढत होता चोरून व्हिडीओ

0

मुंबई,दि.20: IIT Mumbai: चंदीगड विद्यापीठानंतर आता आयआयटी मुंबईमध्येही (IIT Mumbai) एका विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडीओ बनवल्याची घटना समोर आली आहे. चंदीगढच्या खासगी विद्यापीठातील 60 हून अधिक विद्यार्थिनींच्या अंघोळ करतानाच्या एमएमएस कांडने देशभरात खळबळ उडविलेली असताना आता मुंबईतील प्रसिद्ध आयआयटी मुंबई कॉलेजमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थीनीचा बाथरुममध्ये चोरून अश्लिल व्हिडीओ काढण्याचे हे प्रकरण  आहे. 

याप्रकरणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (IIT Mumbai) विद्यार्थिनीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विद्यार्थिनीचा आरोप आहे की, रविवारी रात्री कँटीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने वसतिगृह 10 (H10) च्या बाथरूममध्ये तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पिंटू गरिया असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीच्या मोबाईलमधून अद्याप कोणताही व्हिडीओ सापडलेला नाही.

हेही वाचा ६० विद्यार्थीनींचा आंघोळ करताना रेकॉर्ड केला व्हिडिओ, MMS व्हायरल

बुधवारी या आरोपीला न्यायालयात हजर केले जाईल. आरोपीने विद्यार्थीनीच्या बाथरुममध्ये डोकावण्यासाठी ज्या पाईपचा वापर केला होता तो पाईप बंद करण्यात आल्याचे आयआयटी प्रशासनाने म्हटले आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलू, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याच दरम्यान आयआयटी मुंबईने एक निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, आयआयटीच्या वसतिगृहातील नाईट कॅंटीनमध्ये काम करणारा कर्मचारी पाईप डक्टवर चढून बाथरूममध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होता. सध्या त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीकडे असलेल्या फोनमध्ये कोणते फुटेज आहे, याबाबत आम्हाला अद्याप काहीही माहिती नाही. कँटीनला तात्काळ बंद करण्यात आले असून केवळ महिला कर्मचारी असताना ही सुरु राहणार आहे.

आयआयटी मुंबईने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आरोपीने ज्या पाईपचा वापर केला, तो परिसर सध्या ब्लॉक करण्यात आला आहे. आयआयटी मुंबई आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जे आवश्यक आहे, ते सर्व आम्ही करू. आयआयटी मुंबईचे डीन प्रोफेसर तपनेंदू कुंडू म्हणाले की, वसतिगृहाचे कँटीन पूर्वी पुरुष कर्मचारी चालवत होते. संस्थेने या प्रकरणावर त्वरित कारवाई केली आहे. आयआयटी मुंबईमधील बाथरूमकडे जाणारा रस्ता सील करण्यात आला आहे. वसतिगृह विभाग H10 चा तपास केल्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here