अमरावती,दि.२७: Amravati Accident: ट्रक तवेराच्या जोरदार धडक झाल्यानं भीषण अपघात (Accident) घडलाय. ओव्हरटेक करणाच्या नादात ट्रक आणि तवेराची जोरादार धडक झाल्यानं भीषण अपघात घडलाय. अमरावती (Amravati) शहरातील रहाटगाव रिंगरोडवर ही घटना घडली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ माजलीय.दरम्यान या घटनेत मरण पावलेल्या आणि जखमी झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाती ट्रक अमरावती वरून नागपूरकडे जात होता. तर तवेरा अमरावती वरून वलगावच्या दिशेनं जात होती, टवेरा वाहनातील मृतक आणि जखमी हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहिती नुसार मृतक हे अंजनगाव बारी येथील रविवासी असून मुलाच्या लग्नाच्या बोलणी करण्यासाठी पोकळे परिवार जात असल्याची माहिती आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रोशन रमेश आखरे (वय २७), प्रतिभा सुभाष पोकळे (वय ५०, दोघेही रा. अंजनगावबारी), कृष्णा सचिन गाडगे (वय ०८, रा. शिरजगाव कसबा), गजानन दारोकार (वय ४५, रा. जरुड) अशी रहाटगाव रिंगरोडवर झालेल्या अपघातातील मृतांची नावे आहेत. तर राजू बाबूराव किरनाके (वय ५२, न्यू. फुटाळा कॅम्पस, नागपूर) आणि सागर श्यामराव बाहे (वय २८, रामनगर, नागपूर) या दोघांचा मृत्यू अमरावती ते नागपूर महामार्गावर सावर्डी येथील पुलाजवळ झाला.
अंजनगावबारी इथून १० जण तवेरा वाहनामधून सोयरिकसंबंधाकरिता शिरसगाव कसबा येथे जात होते. दुपारी बाराच्या सुमारास रहाटगाव रिंगरोडवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका मालवाहू ट्रकने तवेराला जोरदार धडक दिली. अपघातानंतर कार रस्त्याच्या एका बाजूला तर ट्रक दुसऱ्या बाजूने विजेच्या खांबावर जाऊन धडकल्याने एक खांबही कोसळला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका आठ वर्षाच्या मुलासह तवेरा चालकाचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त या अपघातात विजयराव भाऊराव पोकळे (वय ५५), ललिता विजयराव पोकळे (वय ५०), सुभाष भाऊराव पोकळे (वय ६०), सुरेश भाऊराव पोकळे (वय ५८, सर्व. रा. अंजनगावबारी), संगीता गजानन दारोकार (वय ३५, रा. जरुड), रश्मी सचिन गाडगे (रा. शिरजगावकसबा), असे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले व नंतर तेथून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.