मुंबई,दि.19: अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींच्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार (Ajit Pawar) या गटासह महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झाले. सहा महिन्यांपासून अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. तर त्यांच्या गटातील आठ आमदार मंत्री झाले आहेत. अजित पवार महायुतीत गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा सातत्याने वेगवेगळ्या पक्षातील किंवा त्यांच्याच नेत्यांकडून केला जात आहे.
अजित पवारांनी विरोधी पक्षांमधील नेते असो अथवा अजित पवारांचे समर्थक, अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे.एवढच नाही तर त्यांचे बॅनर देखील लागले होते. आता चर्चांना राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) वक्तव्यामुळे पुन्हा उधाण आले आहे.
दरम्यान, अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि आमदार अमोल मिटकरी यांनी यावर भाष्य केलं आहे.अमोल मिटकरी यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मिटकरी म्हणाले, 2024 चा संकल्प एवढाच की, राज्याचे मुख्यमंत्री हे अजित पवार व्हावे आणि त्यासाठी राष्ट्रवादी पडेल ते काम करेल.
अजित पवार गट रेशीमबागेत जाणार नाही याविषयी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, स्वत:च्या पक्षाने कुठे जावे हा त्यांचा अधिकार आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या चळवळीतले आम्ही आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण दिलं जाणार आहे.