बारामती,दि.7: आज (दि.7) तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. नणंद भावजय यांच्यात होणाऱ्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी यांनी सहकुटुंब मतदान केले. रोहित पवार यांनी अजित पवार गटावर पैसे वाचल्याचे गंभीर आरोप करत व्हिडीओ शेअर केले आहेत.
रोहित पवार यांनी X वर पोस्ट करत व्हिडीओ शेअर केले आहेत. विचारांची कास सोडलेल्यांना दिवसा सामान्य लोकांची कामं करता येत नाहीत मात्र बारामती मतदारसंघात निवडून येण्यासाठी रात्रभर जे ‘उद्योग’ सुरू आहेत त्याचे हे व्हिडीओ.. तरीही स्वाभिमानी मतदार विकला जाणार नाही. असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
अपेक्षा आहे निवडणूक आयोग झोपेत नसेल आणि यावर कायदेशीर कारवाई होईल. अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. पवार म्हणाले की, बारामतीत काही ठिकाणी 2500 रुपये, 3000 रुपये, 4 हजार रुपये प्रति मत अशाप्रकारे पैसा वाटला गेला. पीडीसीसी बँक गरीबाला 5 वाजता बंद होते. परंतु पैसे वाटण्यासाठी रात्री 1-2 पर्यंत सुरू राहते.
पीडीसीसी बँक, कर्मचारी आणि झेड सिक्युरिटीचा वापर केला गेला. पोलिसांच्या गाडीचा पैशासाठी वापर झाला पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले. ही लढाई जनशक्तीविरुद्ध धनशक्ती झालीय. जनशक्ती ही शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या बाजूने तर धनशक्ती ही अजित पवारांच्या बाजूने असल्याचा टोला त्यांनी लगावला.