Ladki Bahin | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा 

0

मुंबई,दि.१२: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली आहे. (Ajit Pawar’s Big Announcement For Ladki Bahin). लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) दरमहा १५०० रूपये दिले जातात. पात्र महिलांना दरमहा १५०० रूपये मिळत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आणखी दिलासादायक बातमी आहे. आता योजनेतील महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी बँकेतून ४० हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. याबाबत सरकार प्रयत्नशील असून त्याबाबतचा विचार सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केले आहे. ZEE 24 तासने याबाबत वृत्त दिले आहे. 

Ajit Pawar’s Big Announcement For Ladki Bahin

अनेक महिलांना छोटासा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते मात्र भांडवल नसल्याने त्यांना व्यवसाय सुरु करता येत नाही. ज्या बहिणींना उद्याोग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवर लघु उद्याोगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून शासनातर्फे भरण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली. (Ajit Pawar Marathi News)

Ajit Pawar’s Big Announcement For Ladki Bahin | Ladki Bahin | लाडकी बहीण | Ajit Pawar Marathi News |

लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले. राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. या योजनेवर 45 हजार कोटी रुपये खर्च होतात. एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला, तरी विरोधक अफवा पसरवतात. पण बहिणींनी विरोधकांच्या या अफवांवर विश्वास ठेवू नये. असेही पवार म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here