मुख्यमंत्रीपदाची घोषणा करताना भाजपाची लोक इतकी रडायला लागली की: अजित पवार

0

मुंबई,दि.3: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनासाठी सभागृहात केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मिश्किल टिपण्णी केली. यावेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी नव्या सरकारची आपल्या हटके शैलीत फिरकी घेतली. 

“आता हे नवं सरकार कसं आलं काय आलं यात मी जात नाही. पण एकनाथराव तुम्ही मला जरी एकदा कानात सांगितलं असतं की उद्धव ठाकरेंशी बोला आणि अडीच वर्ष झालीत मला मुख्यमंत्री करा तर मी नक्कीच त्यांच्याशी बोललो असतो. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता”, असं अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी विधानभवनात उपस्थित असेलल्या आदित्य ठाकरेंकडेही याची विचारणा केली. “काय आदित्य आपल्याला काही प्रॉब्ले नव्हता ना?”, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या खुमासदार शैलीनं विधानभवनात एकच हशा पिकला. 

एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव फडणवीसांनी जाहीर केल्याच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख करत अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. “फडणवीसांनी शिंदेंची मुख्यमंत्रीपदाची घोषणा करताना भाजपाची लोक इतकी रडायला लागली की गिरीश महाजन तर फेटा सोडून डोळ्यालाच लावतो की काय असं झालं होतं. सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. कुणी काहीही म्हटलं तरी सगळ्यांचा मनात धाकधूक आहेच. चंद्रकांतदादा तुम्ही तर बाक वाजवूच नका. कारण तुम्हाला मंत्रीपद मिळेल की नाही याची काही शाश्वती नाहीय”, असं अजित पवार म्हणाले आणि विधानभवनात एकच हशा पिकला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here