छत्रपती संभाजीनगर,दि.27: अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीला 48 पैकी 31 जागांवर विजयी केले होते. विधानसभा निवडणुकीमध्येही हाच कल राहण्याची शक्यता अनेक सर्व्हेंमधून स्पष्ट झाले. परभणीतील पाथरीचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांनी शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे.
दुर्राणी यांचा संभाजीनगरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश पार पडला. दरम्यान पक्षप्रवेशानंतर केलेल्या भाषणात त्यांनी बरं झालं मी शून्य होण्याआधी परत आलो असं उपहासात्कमपणे म्हटलं. कूछ तो मजबूरी होती है, वरणा कोई बेवफा नाही होता असं सांगत बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या अप्रत्यक्षपणे अजित पवारांसोबत जाण्यामागील कारण सांगितलं.
साहेबांना सोडून गेलेले अनेक पाहिले, ते पुन्हा विधानभवन परिसरात दिसले नाहीत. ते शून्य झाले. बरं झालो मी शून्य होण्याआधी परत आलो असंही यावेळी ते उपहासात्मकपणे म्हणाले. यावेळी त्यांनी शेरोशायरी करत मोदी सरकारवर टीका केली. शत्रू हुशार आहे, तुम्हाला सहकार्य देऊन मारेल असं ते म्हणाले.