महत्वाच्या कामाला महत्व देण्यापेक्षा नको त्या चर्चेला जास्त महत्व दिलं जातं: अजित पवार

0

मुंबई,दि.२: महत्वाच्या कामाला महत्व देण्यापेक्षा नको त्या चर्चेला जास्त महत्व दिलं जातं, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधकांना टोला लगावला. मुंबईत सात वर्षानंतर दोन मेट्रो मार्ग हे प्रवासी वाहतुकीकरता सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. सात वर्षांपूर्वी जुन २०१४ ला मेट्रोचा पहिला मार्ग घाटकोपर ते वर्सोवा हा प्रवासी वाहतुकीकरता सुरु झाला होता. त्यानंतर मुंबईत एकुण पाच मेट्रो मार्गांची कामं टप्प्याटप्प्याने सुरू झाली. यापैकी दोन मेट्रो मार्गावरील काही भागात प्रवासी वाहतुक अखेर सुरू झाली आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले की, “मुंबईकरांच्या दृष्टीने आजचा क्षण खूप महत्वाचा आहे. महत्वाच्या कामाला महत्व देण्यापेक्षा नको त्या चर्चेला जास्त महत्व दिलं जातं, लोकांचं लक्ष भरकटवण्याचं काम केलं जातं. केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या देशाने वेगवेगळे पंतप्रधान पाहिलेत आणि राज्यानेही वेगवेगळे मुख्यमंत्री पाहिले आहेत. आम्ही यापूर्वीच्या आघाडी सरकारमध्ये काम करताना अनेक प्रकल्प चालायचे, परंतु तो प्रकल्प कुणाचे लक्ष घातल्यानंतर पूर्ण होतं, हे महत्वाचं आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी वैयक्तिक लक्ष घातलं,” असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

“मेट्रो ही आपली सर्वांची आहे, त्यामुळे ती स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. कुठेकरी पचकन थुंकायचं, हार्ट काढायचा, बाण काढायचा, कुणाचंतरी नाव लिहायचं..असले धंदे काही करू नका…परदेशात कसे मुकाट वागता?, कचरा टाकता का, घाण टाकता, इथं का आओ-जाओ घर तुम्हारा?, कसंही वागायचं, हा आपला महाराष्ट्र आहे, ही आपली मुंबई आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला वारसा आहे, त्यामुळे मेट्रो स्वच्छ ठेवा,” असं आवाहन अजित पवारांनी केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here