मुंबई,दि.24: AIUDF चीफ बदरुद्दीन अजमल यांनी मुस्लिम IAS-IPS महिलांबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आसाममधील राजकीय पक्ष असलेल्या AIUDF चे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी मुस्लिम IAS-IPS आणि डॉक्टरमहिलांना हिजाब परिधान करण्याचे आवाहन केले आहे. करीमगंज येथे एका राजकीय सभेला ते संबोधित करत होते.
मुस्लिम समाजातील IAS-IPS आणि डॉक्टर झालेल्या महिलांनी हिजाब घातला पाहिजे. मुस्लिम महिलांना हिजाब घालणं किंवा स्वत:चे केस झाकता येत नसतील, तर त्या मुस्लिम आहेत, हे कसं समजेल?. AIUDF चीफ बदरुद्दीन अजमल यांनी हे वक्तव्य केलय.
‘मुली जेव्हा शिक्षणासाठी बाहेर जातात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हिजाब परिधान केलेला असतो. त्यांची नजरदेखील खाली असते आणि त्या मान खाली घालूनच पुढे जाताना दिसून येतात, असे चित्र मी बाहेरील अनेक भागात पाहिले आहे. मात्र, आसामधील मुलींचा विचार केल्यास, त्यांनीही हिजाबमध्ये राहायला हवं. डोक्यावरील केस झाकून ठेवणे आणि बुरख्यात असणे हा आपला धर्म आहे,’ असेही बदरुद्दीन अजमल यांनी म्हटलं आहे.
भुताची दोरी
मुलींचे केस हे भुताची दोरी असते, मुलींचा मेकअप भुताची दोरी असते. म्हणूनच बाजारात जाण्यापूर्वी मुलांचा चेहरा झाकलेला आणि नजर खाली असायला हवी. सायंसचे शिक्षण घ्या, डॉक्टर व्हा किंवा आयएएस, आयपीएस बना. जर तुम्ही या गोष्टींचं अनुकरुन केलं नाही, तर मुस्लीम डॉक्टर, मुस्लीम आयपीएस कोण?, हे कसे समजणार?, तेही लोक आहेत, आपणही आहोत, मग दोघांमधला फरक कसा लक्षात येणार, असेही अजमल यांनी म्हटले आहे.
मुस्लिम चोरी, दरोडा, रेप…
मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. “मुस्लिम चोरी, दरोडा, रेप आणि लुटमारी सारख्या गुन्ह्यांमध्ये नंबर 1 आहेत. आपण तुरुंगात जाण्यातही नंबर 1 आहोत” असं ते म्हणाले होते.