AIMIMचे असदुद्दीन ओवेसी भले राष्ट्रवादी नसतील, पण ते देशभक्त आहेत BJP खासदाराची प्रतिक्रिया

0

दि.5: AIMIM एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा सर्वांनी तीव्र निषेध केला आहे. लोकशाहीत हिंसेला स्थान नाही, असे सर्व पक्षांच्या नेत्यांनी एका आवाजात म्हटले आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनीही या घटनेचा निषेध केला असून केवळ अतार्किक कट्टरपंथीयांनाच खासदार ओवेसीची हत्या करायला आवडेल, असे म्हटले आहे. ओवेसी हे राष्ट्रवादी नसूनही देशभक्त आहेत, असं ट्विट स्वामींनी केलं आहे.

ओवेसी भले राष्ट्रवादी नसतील पण ते देशभक्त आहेत

आपल्या विधानांमुळे आणि युक्तिवादामुळे चर्चेत असलेले भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, तर्काच्या परंपरेवर विश्वास नसणाऱ्या कट्टरपंथीयांनाच खासदार ओवेसी यांची हत्या करायची आहे. ओवेसी भले राष्ट्रवादी नसतील पण ते देशभक्त आहेत. फरक एवढाच आहे की ओवेसी आपल्या देशाचे रक्षण करतील पण हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे यावर त्यांचा विश्वास नाही. आपण त्यांच्या स्पष्ट युक्तिवादांना सामोरे जावे आणि लोकांना रानटीपणावर उतरू देऊ नये.”

ओवेसी पूर्वजांना हिंदू मानत नाहीत

सुब्रमण्यम स्वामी यांनी ओवेसींबाबत यापूर्वीच हे मत मांडले आहे. 2016 मध्ये ते म्हणाले होते की ओवेसी हे देशभक्त आहेत कारण ते परदेशात भारताच्या रक्षणात बाजू मांडतात. तथापि ते राष्ट्रवादी नाहीत कारण ते आपल्या पूर्वजांना हिंदू मानत नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here