Ajit Pawar : Omicron Variant च्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्र सरकारला केली मोठी सूचना

0

Ajit Pawar : Omicron Variant च्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी केंद्र सरकारला (Central Government) मोठी सूचना केली आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ओमिक्रॉनचा (Omicron) रुग्ण उठल्यानंतर अनेक देशात चिंता व्यक्त करण्यात येत होती. भारतातही या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातही (Maharashtra) ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष देण्यात येत आहे. ओमिक्रॉनचा फैलाव रोखता यावा यासाठी केंद्र सरकारने वेगळा निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

जर आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर बंदीच घालायची असेल तर अशी विमाने ही फक्त मुंबईतच येत नाहीत, तर ती देशातील इतर राज्यांमध्येही येत असतात. लोक एका राज्यात उतरून दुसऱ्या राज्यात कनेक्टिंग विमान पकडण्यासाठी जात असतात. याचा विचार करून केंद्र सरकारने यावरही निर्णय घेतला पाहिजे, असा सल्ला अजित पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

मुंबईत (Mumbai) अजित पवार (Ajit Pawar) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील लसीकरणावरही (Vaccination) भाष्य केले. लोकांनी लसींचे (Vaccine) दोन्ही डोस घ्यावे यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. तसेच, काही ठिकाणी वेगळ्या प्रकारची बंधने आणून दुसरा डोस घेण्यासाठी लोकांना भाग पाडण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचेही पवार म्हणाले.

राज्यात मुंबई (Mumbai) यांसारख्या मोठ्या शहरांत कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस शंभर टक्के पूर्ण होत आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग तितकासा दिसत नाही. अशा जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. याचे कारण म्हणजे दुसरा डोस बाकी असणाऱ्या लोकांची संख्या मोठी असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here