कारला धडकल्याने ट्रकचा ताबा सुटला, पूल तोडून नदीवर 1 तास लटकला

0

सोलापूर,दि.19: सोशल मिडीयावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. व्हिडीओ पाहून धक्का बसतो. असा अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. केंटकीमध्ये सेमी ट्रकचा अपघात इतका धोकादायक झाला की तो पूल तोडून पुढे गेला. ट्रक चालकाचे नशीब म्हणजे ट्रक पूर्णपणे नदीत पडला नाही. अपघातानंतर महिला ट्रक चालक सुमारे तासभर हवेत लटकत राहिली. तिचा जीव वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम राबवण्यात आली.

ही घटना मार्च महिन्यात घडली होती. आता त्या ट्रकचा डॅश कॅम व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका कार चालकाच्या छोट्याशा चुकीमुळे एवढा मोठा अपघात कसा झाला हे स्पष्ट दिसत आहे, त्यामुळे सर्वसामान्यांसह संपूर्ण यंत्रणाच हैराण झाली आहे. अपघाताचे व्हिडिओ हृदय हेलावणारे आहेत.

हा व्हिडिओ केंटकीमधील लुईसविले ब्रिजचा आहे. हा पूल ओहायो नदीवर बांधण्यात आला आहे. मार्च महिन्यात या पुलावर भीषण अपघात झाला होता, त्यात एक सोमी ट्रक पूल तोडून पुढे जाऊन खाली लटकत होता. आता इतक्या दिवसांनी या अपघाताचा डॅश कॅम व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता. सेमी ट्रक ड्रायव्हर तिची गाडी अगदी आरामात चालवत आहे. अचानक समोरून एक कार येते आणि त्यांच्या ट्रकला धडकते. तोल गेल्यानंतर ट्रकचालक ट्रकवर नियंत्रण ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते, मात्र ते शक्य होत नाही. सेमी ट्रक पुलाची हद्द तोडून पुढे जातो आणि हवेत लटकतो. यानंतर त्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनही केले जाते.

कॉलिन रग नावाच्या ट्विटर हँडलने हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात या अपघातासाठी 33 वर्षीय ट्रेवर डब्ल्यू ब्रॅनहमला जबाबदार धरण्यात आले आहे. त्यांची कार सिस्कोच्या सेमी ट्रकच्या ट्रेलरला धडकली. हे 26 वर्षीय सिडनी थॉमस चालवत होते, ज्याने अपघात टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. या अपघातानंतर त्याच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अपघातानंतर तो स्वत: व्हीलचेअरवर आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here