‘बाहुबली’ नंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी केली ‘कृष्णा’ चित्रपटाची घोषणा

0

आमिर खान दिसणार कृष्णाच्या तर दीपिका पादुकोणही साकारणार भूमिका

दि.17: दिग्दर्शक एस. एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित ‘बाहुबली’ (Bahubali) चित्रपट सुपरहिट ठरला होता. ‘बाहुबली’ नंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी त्यांच्या दोन चित्रपटाची घोषणा केली आहे. एस. एस. राजमौली यांनी ‘आरआरआर’ आणि ‘कृष्णा’ या चित्रपटांची घोषणा केली आहे. नुकतेच एक मोठे सरप्राईज प्रेक्षकांना मिळाले आहे. राजामौली यांच्या ‘कृष्णा’ या आगामी भव्य चित्रपटाची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘कृष्णा’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) ‘कृष्णा’ आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणही भूमिका साकारणार आहे. या भव्य चित्रपटाची छोटीशी झलक या ट्रेलरमध्ये दिसत आहे. या ट्रेलरमधून आमिर खान आणि दीपिका पदुकोण नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार हे जाहीर झाले आहे. मात्र, अद्याप त्यांचे लूक रिव्हील करण्यात आलेले नाहीत.

ट्रेलरमध्ये ‘महाभारता’च्या कुरुक्षेत्राची झलक पाहायला मिळत आहे. भव्य सेट आणि संगीत यात पाहायला मिळत आहे. मात्र, आता आमिर आणि दीपिकाचा लूक कधी प्रदर्शित होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here