एकनाथ शिंदे यांच्यावरील अभिनेता शरद पोंक्षेंची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

0

मुंबई,दि.25: शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरील अभिनेता शरद पोंक्षेंची (Sharad Ponkshe) पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठे खिंडार पाडले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही लोकांनी एकनाथ शिंदेंच्या या बंडाला पाठिंबा दिसतोय तर काही जणांचा विरोध. यासगळ्यात अभिनेता शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नकळत एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला आहे.

राज्यातील राजकीय वातावरण सध्या जोरदार पेटलेलं आहे. तणाव निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर अनेकजण आपलं मत मांडताना दिसत आहे. अनेक कलाकारही यावर आपली प्रतिक्रिया देत आहे. मात्र कधीकधी राजकीय मत मांडल्यामुळे कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. असंच काहीसं सध्या अभिनेते शरद पोंक्षे यांच्याबाबतीत घडत आहे. त्यांनी कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेल्या पोस्टमुळे सध्या त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

शरद पोंक्षेंनी (Sharad Ponkshe) त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शरद पोंक्षे यांच ‘दुसरं वादळ’ हे पुस्तक दिसतं आहे. तर यासोबतच त्याच्या पाठी शरद पोंक्षें यांच्यासोबत एकनाथ शिंदे दिसत आहेत. या पोस्टमध्ये “हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वत: ची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं…सख्ख्या भावासारखे ते माझ्या मागे उभे राहिले,” असे लिहिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

ही पोस्ट शेअर करत “कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा आणि माझा एक फोटोही छापलाय यात! त्यांनी केलेल्या मदतीबद्दल यात सविस्तर लिहिलंय, दुसरं वादळ एका लढवय्या अभिनेत्याने कॅन्सरवर केलेली मात! एका झुंजीची गाथा! – शरद पोंक्षे, दोन महिन्यात दुसरी आवृत्ती!

सोशल मीडियावर अनेकजण यासंदर्भात पोस्ट करुन तो पाठिंबा-विरोध दर्शवत आहेत. आता मराठी अभिनेता जे हिंदुत्ववादी आहेत,सावरकरांच्या विचारांचे निष्ठावंत सेवक आहेत अन् गेल्या काही महिन्यांपासून भाजपाचे समर्थक आहेत असं वाटू लागलंय त्या शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला नकळत पाठिंबा देणारी एक पोस्ट केलेली आहे,ज्याची सध्या चर्चा रंगली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here