अभिनेता शाहरुख खानने १३ वर्षांपूर्वी व्यक्त केली होती ही भीती

0

दि.२३: अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात तुरुंगात आहे. अजून आर्यन खानला जामीन मिळाला नाही. NCB ने अभिनेत्री अनन्या पांडेंची चौकशी सुरू केली आहे. अभिनेत्री अनन्या पांडेची सलग दोन दिवस चौकशी झाली आहे. आर्यन खानचा पाय दिवसागणिक खोलात जात असताना शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

१३ वर्षांपूर्वी शाहरुख खाननं एका जर्मन वाहिनीला मुलाखत दिली होती. त्यात शाहरुखनं आपल्या मनातील सर्वात मोठी भीती बोलून दाखवली. मला मिळत असलेली प्रसिद्धी माझ्या मुलांचं आयुष्य खराब करू शकते आणि असं कधीच घडू नये असं मला वाटतं, अशी भावना त्यावेळी शाहरुखनं व्यक्त केली होती. शाहरुखला १३ वर्षांपूर्वी वाटलेली भीती आज खरी ठरली आहे.

माझ्या मनात असलेली सर्वात मोठी भीती माझ्या मुलांबद्दल आहे, असं शाहरुख जर्मन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता. ‘माझ्या प्रसिद्धीचा त्यांच्यावर विपरित परिणाम होऊ नये हीच माझी इच्छा आहे. त्यांचा वडील म्हणून माझी ओळख व्हावी असं मला वाटतं. शाहरुखची मुलं अशी त्यांची ओळख समाजात होऊ नये. त्याऐवजी त्यांच्यामुळे लोकांनी मला ओळखावं असं मलापासून वाटतं,’ असं शाहरुखनं म्हटलं होतं. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here