अभिनेता गोविंदा करणार या पक्षात प्रवेश, या मतदार संघातून लोकसभेचा उमेदवार?

0

मुंबई,दि.22: अभिनेता गोविंदा राजकारणात पदार्पण करणार असल्याचे वृत्त आहे. गोविंदा शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. शिवसेना पक्ष व चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले तर राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाले. यामुळे शिंदे गट व अजित पवार गटाची जास्तीत जास्त उमेदवार निवडूण आणण्याची रननिती ठरली आहे.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या रेसमध्ये आणखी एका अभिनेत्याचं नाव चर्चेत आहे. अभिनेता गोविंदा आहुजाला उत्तर पश्चिम मुंबईसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत ZEE 24 तासने वृत्त दिले आहे.

ZEE 24 तासने वृत्तानुसार अभिनेता गोविंदा शिंदे गटात प्रवेश करणार आहे. गोविंदा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. या अनुशंगाने अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाविकास आघाडीकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे. याआधी त्यांचे वडील गजानन किर्तीकर हे या जागेवर निवडुन आले आहेत. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट वेगळे झाल्यानंतर गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटाचा मार्ग पकडला. आणि मुलगा अमोल किर्तीकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात राहिला. 

या आधी गोविंदाने 2004 मध्ये उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक  लढवली होती. यावेळी भाजपच्या राम नाईकांच्या अभेद किल्ल्यांला गोविंदाने भगदाड पाडले होते. त्यामुळे उत्तर मुंबईतून लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसचा झेंडा रोवला गेला होता. अभिनेता म्हणून गोविंदा प्रसिद्ध आहे. गोविंदा समाजकार्यासाठीदेखील चर्चेत असतो. अमोल किर्तीकर यांच्याविरोधात हा चेहरा चालू शकतो. त्या अनुशंगाने चाचपणीही सुरू असल्याची माहिती मिळते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here