मुंबई,दि.1: अभिनेते अरुण कदम (Arun Kadam) यांची पोस्ट चर्चेत आहे. सुरुवातीपासूनच वर्ष भीमा कोरेगाव ही घटना चांगलीच चर्चेत आहे. यावरून बरेच मतभेद होताना दिसतात. अनेकजण याबद्दलची त्यांची मतं मांडत असतात. आता अरुण कदम यांनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
अरुण कदम यांनी शेअर केली पोस्ट | भीमा कोरेगाव
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून आज प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेले अरुण कदम सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते त्यांचे विचार, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतात. आता नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली, ज्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे.
तुम्ही भेड बकरींची संतान नसून…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे केलेल्या भाषणात त्यांनी केलेलं वक्तव्य अरुण कदम यांनी त्या पोस्टमधून शेअर केलं. या पोस्टमध्ये “विजयस्तंभ भिमा कोरेगाव ऐतिहासिक पुरावा” असं लिहित त्याखाली “तुम्ही शूर वीरांची संतान आहात ही गोष्ट काल्पनिक नव्हे, तर भीमा कोरेगावला जाऊन बघा, तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की, तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात.” असं लिहिलेलं आहे. तर त्याच खाली “डॉ. बाबासाहेब आंबेडकर (दिनांक 25.12.1927 महाडचे भाषण)” असाही संदर्भ दिलेला आहे. आता त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.