Raj Thackeray Birthday: राज ठाकरेंच्या वाढदवसानिमित्त अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदेची पोस्ट चर्चेत

0

दि.14: Raj Thackeray Birthday: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील क्रांतीचौक पेट्रोल पंपावर 54 रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोलचे वाटप करण्यात आले. मनसेचे उपाध्यक्ष माऊली थोरवे आणि सविता थोरवे आज दिवसभराची योजना राबवली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. राज ठाकरे सध्या होम क्वारंटाईन असल्यामुळे ते आज कोणालाही भेटणार नाहीत. त्यामुळे मनसैनिकांनी शुभेच्छा देण्यासाठी ‘शिवतीर्थ’वर येऊ नये, अशी सूचना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली होती.

मात्र, सोमवारी रात्री मनसैनिकांनी शिवतीर्थबाहेर जमत राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे यांचा वाढदिवस आमच्यासाठी उत्सवाप्रमाणे असल्याची भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर या मनसैनिकांनी शिवतीर्थबाहेर फटाके लावून आनंद साजरा केला. तसेच मनसैनिकांनी एका सुरात ‘हॅपी बर्थडे टू यू’ म्हणायला सुरुवात केली. अखेर राज ठाकरे काहीवेळासाठी गॅलरीत आले. त्यांनी मनसैनिकांच्या दिशेने हात उंचावत शुभेच्छांचा स्वीकार केला.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत. अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदेंनी देखील राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जी व्हायरल होतोये. राजा माणूस… @raj_shrikant_thackeray वाढदिवस शुभेच्छा. अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर लिहिली आहे. तसेच राज ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटोदेखील त्यांनी पोस्ट केला आहे. केदार शिंदे यांच्या या पोस्टवर अनेकांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या दोघांच्या मैत्रिची कौतुक केलं आहे.

वाढदिवस_साहेबांचा_वाढदिवस_लोकप्रिय_माणसाचा #वाढदिवस_अभ्यासू_नेतृत्वाचा आदरणीय साहेब, तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र विराजमान होवो. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच देवा चरणी प्रार्थना. आपणांस वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा. अशी कमेंट एका चाहत्यांने केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here