सोलापूर,दि.१२: लग्नाचे आमिष दाखवून अत्त्याचार प्रकरणी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बलात्काराप्रकरणी एकास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यात हकिकत अशी की, मौजे मैंदर्गी, ता. अक्कलकोट येथील रहिवासी सुनिल बुध्दाप्पा शिंगे याचे विरुध्द लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केले प्रकरणी दि. २४/०१/२०२३ रोजी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता व त्याप्रकरणी आरोपी सुनिल शिंगे यास अटक करण्यात आली होती.
लग्नाचे आमिष दाखवून अत्त्याचार
यात फिर्यादीचे असे म्हणणे होते की, आरोपी सुनिल शिंगे याच्यासोबत फिर्यादीचे प्रेमसंबंध होते व आरोपीने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून मुंबई येथे पळवून नेले व मुंबई येथे फिर्यादीवर तिच्या संमतीशिवाय अत्याचार केला व नंतर फिर्यादी ही लग्नाचा आग्रह करु लागल्यावर आरोपी हा टाळाटाळ करु लागला त्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
आरोपीने ॲड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत जामीनाचा अर्ज सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला.
यात आरोपीतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, सदर आरोपीने सदर फिर्यादीसोबत हिंदु रिती-रिवाजाप्रमाणे मुंबई येथे लग्न केलेले असून त्यामुळे लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सदर आरोपी व फिर्यादी हे कायदेशीर पती-पत्नी असून सदर फिर्यादीने तिच्या कुटुंबियांच्या दबावास बळी पडून सदरची फिर्याद दाखल केलेली आहे.
सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन सदरील आरोपीस मा. सत्र न्यायालय सोलापूर यांनी रुपये ५०,०००/- च्या जातमुचलक्यावर मुक्त करण्याचा आदेश पारित केला.
यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. दत्ता गुंड, ॲड. संतोष आवळे, ॲड. फैयाज शेख, ॲड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.