सोलापूर,दि.१८: फिर्यादीस लाथा बुक्याने मारहाण करून वाईट उद्देशाने फिर्यादीच्या हाताला व अंगाला धरुन झोंबा झोंबी करून फिर्यादीच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करुन फिर्यादीचा विनयभंग केल्याच्या आरोपातून आरोपींची सोलापूर येथील में प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. चव्हाण यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात हकिकत अशी की, दि.२१/०५/२०१७ रोजी रात्री ९.०० वाजताच्या सुमारास मौजे गुंजेगांव शिवारात रोडवर मागिल पंचायत समिती निवडणूकीत उमेदवाराच्या बाजूनी प्रचार करता का? व का फिरला असे म्हणून निवडणूकीत प्रचार केल्याचा राग मनात धरुन फिर्यादी व तिचा मुलगा यांना गुंजेगांव येथील राहणारे तीन आरोपींनी संगनमत करून हाताने व लाथा बुक्याने मारहाण व वाईट उद्देशाने फिर्यादीचा विनयभंग केल्याची फिर्याद फिर्यादीने मंद्रुप पोलीस स्टेशन येथे दिली होती. सदर फिर्यादीच्या अनुषंगाने संबंधीत पोलीस यंत्रणेने तपास करुन में कोर्टात चार्जशिट दाखल केली होती.
सदर चार्जशिटच्या अनुषंगाने एकुण सरकार पक्षातर्फे एकुण ६ साक्षीदार कोर्टासमोर तपासण्यात आले होते. त्यापकी फिर्यादी व घटना बघणारे साक्षीदारांची उलट तपासणी निर्णायक ठरली. उलट तपासणीमध्ये सदरची केस ही राजकीय व्देषापोटी करण्यात आलेली आहे असा युक्तीवाद आरोपीतर्फे ॲड. अभिजित इटकर यांनी केला. सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपींचे सदर खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड. अभिजित इटकर, ॲड. प्रविण निकम, ॲड. संतोष आवळे, ॲड. राम शिंदे यांनी काम पाहिले.