बीड,दि.३: भीषण अपघातात (terrible accident) तीन मित्रांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील आहेर वडगाववरुन तीन मित्र बुलेटवर बसून बीडकडे (beed) येत असताना त्यांच्या भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की तिघांचाही या अपघातात (accident) मृत्यू झाला आहे. तिन्ही मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यातील अहेरवडगाव जवळ झालेल्या रस्ते अपघातात दुचाकीवरील तीन जण ठार झाले आहेत. औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर (Aurangabad-Solapur Highway) संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
पारसनाथ रोहिटे (वय २२) कृष्णा भारत शेळके (वय २३) आणि अक्षय सुरेश मुळे (वय २२) हे तीन जण एमएच २३ ७२७७ या क्रमांकाच्या बुलेटवरून बीडकडे जात होते. त्या वेळी समोरून येत असलेल्या एसटी बसने दुचाकीस धडक दिली. यात पारसनाथ रोहिटे व कृष्णा शेळके हे जागीच ठार झाले, तर अक्षय मुळे यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना अक्षयचा मृत्यू झाला.