Accident: विजयपूरहून सोलापूरकडे येत असताना कारचा अपघात; चार तरुण जागीच ठार

0

सोलापूर,दि.५: Accident On Vijaypur Solapur Road: विजयपूरहून (Vijaypur) सोलापूरकडे (Solapur) येत असताना कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात चारजण ठार झाले आहेत. कर्नाटक राज्यातील विजयपूरहून सोलापूर कडे येत असताना कारची कवठे गावाजवळील ब्रिजला धडक होऊन आतील चार तरुण जागीच ठार झाले. हा दुर्दैवी अपघात बुधवारी पहाटे २ वाजता घडला. (Car accident while coming from Vijaypur to Solapur; Four young men were killed on the spot)

अरुण कुमारलक्ष्मण एनकंची (वय २१), महबूब महम्मदअली मुल्ला (वय १८), फिरोज सैपनसाब शेख (वय २०), मुन्ना केंभावे (वय २१ सर्व रा. यरगल केंडी ता.सिंदगी जि. विजापूर) असे मरण पावलेल्या चौघांची नावे आहेत. पाचजण कर (क्र. केए ३२ एन २४८४) मध्ये बसून काही कामा निमित्त विजापूरहून सोलापूरला येत होते. कार कवठे गावाजवळल अली असता, नवीन ब्रिजला जोरात धडक बसली, त्यात चौघे जागीच ठार झाले. एकजण गंभीर जखमी झाला.

सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आर.ए.जाधव यांनी पाच जणांना उपचारासाठी पहाटे ४ वाजता शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र चौघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here