Accident: एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, ६ जण जागीच ठार

0

लातूर,दि.१०: लातूर अंबेजोगाई रोडवरील (Latur Ambajogai Road) सायगाव जवळच्या बर्दापूर फाट्यावर (Bardapur fork near Saigaon) रविवारी सकाळी एसटी बसची ट्रकशी धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. (Six people were killed on the spot) तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना अंबेजोगाईच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लातूर येथून प्रवाशांना घेऊन औरंगाबादकडे निघालेली बस सकाळी लातूर अंबेजोगाई रोडवरील सायगाव जवळच्या बर्दापूर फाटा येथील नंदगोपाळ डेअरी खडी केंद्राच्या वळणावर आली तेव्हा तिची समोरून येणाऱ्या पाइपच्या ट्रकशी तिची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यामुळे एसटीच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला.

अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र सकाळी गडद धुके पडले होते. त्यामुळे हा अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे येथील वाहतूक लातूरकडे वळवण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here