“खानांमध्ये शाहरुख खान सर्वात मोठा देशभक्त आहे” अभिजीत भट्टाचार्य

0

मुंबई,दि.28: दिग्गज गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरूख खानबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एक काळ असा होता की शाहरुख खान आणि अभिजीत भट्टाचार्य या जोडीने मोठ्या पडद्यावर राज्य केले. संगीत उद्योगातील दिग्गज गायक अभिजीतने शाहरुख खानच्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये आपला आवाज दिला, पण ‘बिल्लू’ चित्रपटानंतर त्याने शाहरुखसाठी कधीही गाणे गायले नाही. आता वर्षांनंतर अभिजीत शाहरुखबद्दल बोलला आहे.

अलीकडेच, अभिजीत भट्टाचार्य यांनी त्यांचा वर्षानुवर्षे चाललेला संघर्ष विसरून शाहरुख खानचे कौतुक केले. त्यांचीही खिल्ली उडवली. अभिजीतने लेहारन रेट्रोसोबतच्या संवादात शाहरुखला ‘सेल्फ मेड स्टार’ म्हटले आहे. तसेच त्याने शाहरुखचा ‘कर्मशिअल व्यक्ती’ म्हणून वर्णन केले.

आम्हा दोघांचा स्वभाव सारखाच

अभिजीत भट्टाचार्य म्हणतात की, शाहरुख खान यशासाठी लोकांचा वापर करत असला तरी त्याला देशद्रोही म्हणणे चुकीचे आहे. अभिजीत म्हणाला, “आम्हा दोघांचा स्वभाव सारखाच आहे. आमच्यात अहंकार नाही, पण स्वाभिमान आहे.”

आमच्यामध्ये परस्पर मतभेद आहेत, जे मी अनेक वेळा सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तो एक अतिशय व्यावसायिक म्हणजेच कमर्शिअल व्यक्ती आहे. तो तुमचा वापर करेल. तो कोणालाही त्याच्या यशाच्या मार्गापासून दूर करेल, परंतु त्याला देशद्रोही म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.

खानांमध्ये शाहरुख खान सर्वात मोठा देशभक्

अभिजित भट्टाचार्य यांनी शाहरुखचे कौतुक करत त्याला महान देशभक्त म्हटले. शाहरुख खानपेक्षा मोठा देशभक्त कोणी नाही. तुम्ही त्याचे चित्रपट बघा. त्याने ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘स्वदेस’ आणि ‘अशोका’ सारखे चित्रपट केले आहेत. त्याच्याबद्दल कोणी असे कसे म्हणू शकते? विशेषतः जेव्हा त्यांनी आपल्या चित्रपटांमध्ये हिंदू संस्कृतीचा प्रचार केला आहे. खानांमध्ये शाहरुख खान सर्वात मोठा देशभक्त आहे. इतरांचा खरोखरच राष्ट्राशी काहीही संबंध नाही.

अभिजीतने शाहरुखच्या ‘अंजान’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘बादशाह’, ‘मैं हूं ना’, ‘ओम शांती ओम’सह अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. अभिजीतची तक्रार होती की त्याचे नाव चित्रपटाच्या श्रेयसमध्ये नेहमी सर्वात शेवटी दिसत होते. 2009 मध्ये जेव्हा अभिजीतने ‘बिल्लू’साठी ‘खुदया खैर’ हे गाणे गायले होते, तेव्हा त्याची अट होती की या गाण्यात शाहरुखला चित्रित करू नये. पण निर्मात्यांनी हे मान्य केले नाही आणि त्यांनी सोहम चक्रवर्तीला हे गाणे पुन्हा गायला लावले. तेव्हापासून अभिजीतने शाहरुखसाठी एकही गाणे गायले नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here