आम आदमी पार्टीच्या आमदार बलबीर सिंह यांना न्यायालयाने सुनावली 3 वर्षाची शिक्षा

0

दि.23: पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या (AAP) सरकारला मोठा झटका बसला आहे. पटियाला ग्रामीणचे आमदार डॉ बलबीर सिंह यांना रोपर न्यायालयाने 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 9 वर्षांपूर्वी जमिनीवरून झालेल्या कौटुंबिक वादातून बलवीर सिंहने त्यांची पत्नी आणि मुलगा यांनी मेव्हणी आणि तिच्या पतीला मारहाण केली होती.

मारहाण प्रकरणी डॉ.बलबीर सिंह यांच्या मेहुणीने आणि त्यांच्या पतीने गुन्हा दाखल केला होता. दोघांनी बलबीर, त्याची पत्नी आणि मुलावर क्रूरपणे मारहाण केल्याचा आरोप केला होता. गेल्या 9 वर्षांपासून रोपर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आमदार, त्यांची पत्नी आणि मुलाला दोषी ठरवले. यानंतर तिघांनाही तीन वर्षांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. 

पंजाब विधानसभा निवडणुकीत डॉ. बलबीर सिंह यांनी काँग्रेसच्या मोहित मोहिंद्राचा 53 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. तीन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर आता आमदारकी गमावण्याचा धोका आहे. नियमानुसार एखाद्या आमदाराला दोन किंवा त्याहून अधिक वर्षे कारावासाची शिक्षा झाल्यास त्याला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here