Aadhaar Card News: केंद्र सरकारचा आधार कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय

0

नवी दिल्ली,दि.16: Aadhaar Card News: केंद्र सरकारने आधार कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आधार कार्ड हे महत्वाचे आहे. अनेक शासकीय योजनांसाठी याची आवश्यकता असते. देशातील कोट्यवधी आधार कार्डधारकांना (Aadhaar Card) सरकारने मोठा दिलासा दिला आहे. UIDAI ने सांगितलं की, आता आधार अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. UIDAI ने आधार अपडेट करण्याचं शुल्क रद्द केलं आहे. पण, यासाठी एक अट आहे. जर तुम्ही आधार अपडेटची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली, तरच तुम्हाला आधार अपडेटसाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. तेच जर तुम्ही आधार कार्ड फिजिकल काऊंटरवर अपडेट केलं तर त्यासाठी मात्र 50 रुपये द्यावे लागतील.

Aadhaar Card News | या कालावधीत उपलब्ध होणार सुविधा

UIDAI ने सांगितलं की, आधार धारकांना तीन महिन्यांसाठी या मोफत आधार अपडेट सुविधेचा लाभ घेता येईल. आधार कार्ड धारक 15 मार्च 2023 ते 14 जून 2023 पर्यंत त्यांचं आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करु शकतात.

पॅन आधार लिंक करणे अनिवार्य

महत्त्वाची बाब म्हणजे, आधार-पॅन कार्ड लिंक (Aadhaar- Pan Card Link) करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे. यासोबतच, ज्यांनी 10 वर्षांपासून आधारमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत, त्यांनी त्यांचं आधार कार्ड अपडेट करुन घ्यावं, यासाठी UIDAI प्राधिकरण सातत्याने माहिती देत आहे.

Aadhaar Card असे करा अपडेट

आधार कार्ड धारक त्यांच्या आधार क्रमांकाद्वारे https://myaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करु शकतात. यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल. यानंतर तुम्हाला ‘Document Update’ वर क्लिक करावं लागेल. तिथे तुम्हाला तुमचा तपशील दिसेल. त्यानंतर तुम्हाला तुमची अपडेटेड माहिती भरावी लागेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here