ब्रेकिंग: पुणे-सातारा महामार्गालगत असलेल्या कासुर्डी येथील केमिकल कंपनीला भीषण आग

0

पुणे,दि.19: पुणे-सातारा महामार्गालगत (Pune-Satara Highway) असलेल्या कासुर्डी येथील केमिकल कंपनीला भीषण आग (fire) लागली आहे. कासुर्डी (Kasurdi) येथील इलेजर सोलटेक प्रायव्हेट लिमिटेड (Elizer Soltech Pvt Ltd) या कंपनीला भीषण आग लागली आहे. संबंधित कंपनी ही पेंटिंग केमिकल कंपनी असल्याने आगीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे परिसरात धुराचे लोटचं लोट पसरलेले पाहायला मिळत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सध्या अग्निशामक दलाकडून सुरु आहे. संबंधित दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र आगीमुळे कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

संबंधित कंपनी ही केमिकलची असल्याने आगीचा मोठा भडका उडाला आहे. आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचे मोठमोठे लोळ लांबून दिसत आहेत. संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेच अग्निशामन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. पण कंपनीत केमिकल असल्याने आगीचा ठिकठिकाणी भडका उडताना बघायला मिळतोय.

दरम्यान, या आगीमागील नेमकं कारण काय ते अद्याप समजू शकलेलं नाही. कंपनीतील केमिकल हे जास्त ज्वलशनील होतं. त्यामुळेच ही आग जास्त भडकल्याचं चित्र आहे. आगीच्या धुराचे प्रचंड लोळ हवेत पसरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे घटनेपासून दोन ते तीन किमी लांबून आगीच्या धुराचे लोळ दिसत आहेत. त्यामुळे संबंधित आग किती भीषण आहे याचा अंदाज बांधता येईल. अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. जवळपास आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here