सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाने बनवले बनावट आधार कार्ड

0

मुंबई,दि.8: देशाचे सरन्यायाधीश यांच्या नावाने बनावट आधार कार्ड बनवण्यात आले आहे. वास्तविक सामाजिक कार्यकर्त्याने बनावट आधार कार्ड तयार केले जात आहेत हे सिध्द करण्यासाठी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाने बनावट आधार कार्ड बनवले. लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आधारकार्ड हा महत्त्वाचा पुरावा आहे.

आधारकार्ड पैसे देऊन बनावट बनवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही गोष्ट प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याने चक्का देशाचे सरन्यायाीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावानेच स्वतःचे आधारकार्ड बनवून घेतलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नाव आणि पत्ता दुसऱ्याचा मात्र फोटो स्वतःचा अशाप्रकारे सेतूचालक बनावट आधारकार्ड बनवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. श्रीरामपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल मुथ्था यांनी स्वतःचा फोटो असलेलं आधार कार्ड तयार करून घेतलंय. पण यावर नाव मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे असून पत्ताही सरन्यायाधीशांचाच आहे.

केवळ प्रशासनाच्या हि गोष्ट लक्षात यावी यासाठी त्यांनी हे आधारकार्ड बनवले आहे. लोकसभेला आधारकार्ड दाखवल्यानंतर मतदान करता येणार आहे. त्यामुळे कुणाच्याही नावे अशाप्रकारे कार्ड बनवून मतदान केलं जावू शकतं. प्रशासनाने या गोष्टीकडे गंभीरपणे बघावं आणि निवडणूक आयोगाने मतदानकेंद्रात आधारकार्ड खरे कि खोटे हे तपासण्याची यंत्रणा निर्माण करावी अशी मागणी सुनील मुथ्था यांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here