बोगस डिक्री प्रकरणात गुन्हा दाखल होणार; जयराज नागणसूरे यांची माहिती

फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत जयराज नागणसूरे यांनी केली होती तक्रार

0

सोलापूर,दि.24: बोगस डिक्री प्रकरणात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसूरे (Jayraj Nagansure) यांनी दिली आहे. जयराज नागणसुरे यांनी नगर भूमापन अधिकारी किरण कांगणे (City Land Survey Officer Kiran Kangane) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बोगस कॉम्प्रोमाइज डिक्री (Compromise Decree) करून जागा हडपल्याप्रकरणी नागणसुरे यांनी कारवाई करण्याची मागणी केली होती. सोलापूर सिटी सर्वे नंबर 9921/ 1/अ/2 ही जागा बोगस कागदपत्राद्वारे बोगस कॉम्प्रमाईज डिक्री करून हडप केल्याबद्दल संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत जयराज नागणसूरे यांनी तक्रार केली होती.

बोगस डिक्री प्रकरणात गुन्हा दाखल होणार

या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागणसुरे सातत्याने करत होते. पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून लवकरच फौजदारी गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती नागणसुरे यांनी दिली आहे.

काय होते प्रकरण? | Jayraj Nagansure

Civil अपील नंबर 160/ 2012 च्या कॉम्प्रोमाईज डिक्री करून सिटी सर्वे नंबर 9921/1/अ/ 2 ही जागा खालील लोकांनी हडप केलेली आहे. गंगाबाई शंकर मळगे, नागनाथ शंकर मळगे, श्रीदेवी पुजारी, अंबुबाई सिद्धप्पा मळगे, राजकुमार सिद्धपा मळगे, इरण्णा शेंडगे, सखुबाई मळगे, उमा वाघमोडे, अंबुबाई थावरे, रेणुका कोळेकर चन्नम्माबाई आडोळी, भारती जोगदंड, रामराव जोगदंड, नितीन जोगदंड, मीनाक्षी जगताप या सर्वांनी संगणमत करून सोलापूर कोर्टातील जिल्हा न्यायाधीश दोन पवटवाडकर यांच्या कोर्टात रजिस्टर civil अपील नंबर 160/ 2012 हा बोगस बेकायदेशीर कॉम्प्रोमाईज डिक्रि सादर करून कोर्टाची फसवणूक केली असे नागणसूरे यांनी सांगितले, या प्रकरणात 258 ची नोटिस काढून मळगे यांचे नाव कमी होऊन श्यामला संगा यांचे नाव पुन्हा 7/12 सदरी लावण्याचे आदेश नगर भूमापन अधिकारी किरण कांगणे यांनी दिले,वास्तविक या प्रकरणात श्यामला संगा यांचा तक्रारी अर्ज निकाली काढला होता,जयराज नागणसूरे यांनी तक्रार देताच हे काम मार्गी लागून श्यामला संगा यांना न्याय मिळाला, $ नगरभूमापन अधिकारी किरण कांगणे यांचे कारनामे
1) सर्व सामान्य जनतेशी उद्धट वागणे 2) अरेरावीची भाषा बोलणे
3) बोगस नोंदी घेणे.
4) बोगस नोंदीची तक्रार आली तर 258 अंतर्गत नोंद रद्द करणे
5) राजपत्रीत अधिकारी असल्याने आपल्यावर फौजदारी दाखल होत नसल्याने,त्याचा गैरफायदा घेणे. 6) प्रकरण अंगलट आले तर कार्यालयातील एकाद्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी ढकलणे,
सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसूरे यांनी 15 बोगस नोंदीचे पुरावे लोकायुक्त महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी सोलापूर आणि सोलापूर पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे की, वरील प्रकरणात नगर भूमापन अधिकारी सोलापूर किरण कांगणे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी तक्रार दिली आहे.

अस्वीकरण: बातमीतील दाव्याच्या सत्येतेची हमी सोलापूर वार्ता घेत नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here