मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

0

मुंबई,दि.26: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले होते. जरांगे पाटील यांनी आज (दि.26) आमरण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. काल (दि.25) मनोज जरांगे मुंबईकडे निघाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले. फडणवीस यांच्या मुंबई येथील सागर या बंगल्यासमोर उपोषण करण्यासाठी जरांगे पाटील मुंबईकडे निघाले होते. मात्र आज त्यांनी अंतरवाली सराटीत परत येत उपोषण स्थगित केले.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून जवळपास १०४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी ४२५ गुन्हे मराठवाड्यात दाखल करण्यात आले आहेत.

मराठा आंदोलकांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या अशी मागणी वारंवार मनोज जरांगे करत होते. मात्र आता त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरांगे पाटील साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे. त्यांनी मराठा समाजाला शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here