दि.3 : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. काही व्हिडिओ हे मजेशीर असतात. तर काही व्हिडिओतून शिकण्यासारखे असते. अनेकांच्या घरात मांजर असते. मांजर अनेकांना आवडते. तुम्हाला मांजर (Cat) आवडते का? जर आवडत नसेल तर सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ (Viral Video) पाहून तुम्हाला नक्कीच मांजर आवडू लागेल. कारण एका मांजरीनं सतर्कता दाखवत एका लहान बाळाचा जीव वाचवला आहे. याचंच एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. व्हिडिओ पाहून प्रत्येकजण मांजराचं कौतुक करत आहे. हा व्हिडिओ जुना आहे मात्र ट्विटरवर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक लहान बाळ रांगत चाललेलं आहे. तर एक मांजर तिथेच बसलेली दिसत आहे. यानंतर काहीच वेळात लहान बाळ पायऱ्यांच्या दिशेनं जाऊ लागतं. मांजर मात्र तिथेच बसलेली असते. बाळ जेव्हा पायऱ्यांजवळ पोहोचतं तेव्हा मांजर त्याला वाचवण्यासाठी लगेचच उडी घेते आणि बाळाला धक्का देत त्याला तिथून बाजूला करते. व्हिडिओ पाहून असं वाटतं, की जर ही मांजर योग्य वेळी तिथे पोहोचली नसती तर हे बाळ पायऱ्यांवरुन खाली कोसळलं असतं.
Cat saves baby from falling down the stairs🥺 pic.twitter.com/mHpJhnJ69e
— 💉Lars🇳🇴 (@aflyguynew1) September 22, 2021
18 सेकंदाचा हा व्हिडिओ @aflyguynew1 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. 23 सप्टेंबरला ट्विटरवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 90 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. जवळपास 5 लाख लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हजारो लोकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.