अक्कलकोट,दि.२२ : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले या पिता पुत्रांचे दिशात्मक कार्यामुळे श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नावलौकिक होत असल्याचे मनोगत सोलापूर शहराचे पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी व्यक्त केले.
ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जेष्ठ विधीज्ञ ॲड.धनंजय माने, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, जेष्ठ पत्रकार एजाजहुसेन मुजावर, पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी आदिजण उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे विश्वस्त संतोष भोसले, पुरोहित संजय कुलकर्णी, प्रविण देशमुख, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, निखील पाटील, नामा भोसले, कल्याण देशमुख, सतीश महिंद्रकर, सत्तारभाई शेख, गोविंदराव शिंदे, महांतेश स्वामी, चंद्रकांत हिबारे, सागर याळावर, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.