Pushpa: सोशल मीडियावर (Social Media) चाहत्यांचे आवडते ‘पुष्पा’ची (Pushpa) अर्थात अल्लू अर्जुनची (Allu Arjun) क्रेझ संपण्याचे नाव घेत नाहीये. पुष्पाचे (Pushpa) संवाद, अभिनय आणि कथेला रसिकांचे भरभरून प्रेम मिळाले. ‘श्रीवल्ली’, ‘सामी सामी’ आणि ‘ऊं अंटावा’ यांसारख्या त्याच्या गाण्यांवर अनेक रील्स आणि व्हिडिओ बनवले गेले.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. इतकंच नाही तर चाहत्यांमध्ये ही क्रेझ इतकी जबरदस्त होती की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर केले.
आता एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये प्राणीसंग्रहालयात बंद असलेला एक चिंपांझी श्रीवल्ली स्टेप्स करत असल्याप्रमाणे चालत आहे. मग काय लगेच श्रीवल्ली गाण्याचा हा मजेदार व्हिडिओ चाहत्यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओला खूप प्रेम मिळत आहे आणि खूप कौतुकही होत आहे. चिंपांझीच्या या व्हिडिओला आतापर्यंत 13 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमिळ आणि कन्नडमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच ‘पुष्पा 2’ची तयारी जोरात सुरू आहे. असे बोलले जात आहे की ज्या प्रकारे समंथा रुथ प्रभूने ‘पुष्पा’मधील ‘ऊं अंटावा’ हे स्पेशल गाणे केले होते, त्याचप्रमाणे यावेळी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी या चित्रपटात एक खास गाणे करताना दिसणार आहे.