मुंबई,दि.18: Sunny Leone: ऑनलाईन फसवणुकीचे (Online Fraud) प्रकार वाढले आहेत. Pan Card चा दुरुपयोग करून कर्ज घेतल्याच्या घटना घडली आहे. अनेक सर्वसामान्य लोकांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. परंतु हे आता सर्वसामान्य लोकांपुरतंच मर्यादित नाही, तर कलाकरांचीसुद्धा ऑनलाईन फसवणूक झाल्याचं ऐकायला मिळत आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीची (Sunny Leone) ऑनलाईन फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे.सनी लियोनीने स्वतः ट्विट करत याबद्दल सांगितलं आहे.
अभिनेत्री सनी लियोनीने Sunny Leone नुकतंच आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट शेअर केलं होतं. यामध्ये तिनं आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचं उघडकीस आणलं होतं. एका व्यक्तीने आपलं पॅन कार्ड वापरून दोन हजारांच कर्ज काढल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे. सनीने सिबील स्कोर खराब झाल्याचा उल्लेखही ट्विटमध्ये केला होता. परंतु काही वेळेनांतर तिनं हे ट्विट डिलीट केलं आहे.
हेही वाचा तुमचा Pan Card नंबर वापरून कुणी कर्ज तर घेतले नाही ना? असे तपासा
अभिनेत्रीने हा ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणत हे ट्विट केलं होतं. इतर सर्वसामान्य लोकांची किंवा कलाकारांची अशी फसवणूक होऊ नये किंवा त्यांनी वेळीच खबरदारी घ्यावी. इतरांना सावध करण्यासाठी सनीने हे ट्विट केलं होतं. परंतु या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर कमेंट्सचा भडीमार केला आहे. तसेच अनेक ओळखीच्या लोकांनी तिला फोनदेखील केले आहेत. त्यामुळे वैतागणूक अखेर अभिनेत्रीने हे ट्विट डिलीट करणं योग्य समजल्याचं म्हटलं जात आहे.
सनी लियोनीने काल केलेल्या आपल्या ट्विटमध्ये इंडियाबुल्स या सिक्युरिटी कंपनीला टॅग केलं होतं. तसेच इंडियाबुल्सकडे आत्तापर्यंत फसवणूक झालेल्या अनेक लोकांच्या तक्रारी आल्या आहेत. सनी लियोनीची अशी फसवणूक झाल्याने ऑनलाईन फसवणुकीचा मुद्द्दा पुन्हा चर्चेत आला आहे.