Shweta Tiwari: ‘माझ्या ब्रा चं माप देव घेत आहे‘, या विधानामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी आली अडचणीत

0

भोपाळ,दि.२८:Shweta Tiwari: टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडली आहे. देवाच्या नावाने दिलेल्या या वक्तव्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Madhya Pradesh Home Minister Narottam Mishra) यांनी पोलिसांना तपासाचे आदेश दिले असून २४ तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

काय म्हणाली श्वेता तिवारी?

श्वेता तिवारीने बुधवारी भोपाळमध्ये तिच्या ‘शो स्टॉपर’ या वेबसीरिजच्या प्रमोशनदरम्यान हे वक्तव्य केले. तिच्या वेब सिरीजमध्ये तिच्यासोबत रोहित रॉय, दिगंगना सूर्यवंशी आणि सौरभ राज जैन हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना तिने हे वक्तव्य केले तेव्हा तिचे सहकलाकारही तिथे उपस्थित होते. श्वेता तिवारी यावेळी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना म्हणाली की, ‘माझ्या ब्रा चं माप देव घेत आहे’.

Koo App

एक्ट्रेस #ShwetaTiwari का भोपाल में दिया गया बयान निंदनीय है। भोपाल पुलिस कमिश्नर मकरंद देउस्कर को 24 घंटे में तथ्यों और संदर्भ की जांचकर रिपोर्ट देने का निर्देश दिया है, जिसके आधार पर निर्णय लिया जाएगा।

View attached media content

Dr.Narottam Mishra (@drnarottammisra) 27 Jan 2022

पीटीआयच्या वृत्तानुसार, श्वेता तिवारीच्या विधानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती तिच्या अंतर्वस्त्रांबद्दल बोलताना कथितपणे देवाचा उल्लेख करताना ऐकू येते. कार्यक्रमातून मिळालेल्या क्लिपनुसार, श्वेता तिवारीने “देव माझ्या ब्राचे माप घेत आहे” असे विधान केले. ही एक फॅशनशी संबंधित वेबसीरिज आहे ज्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here