Home चित्रपट चेहऱ्यामागचा चेहरा समोर! ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’मध्ये अशोक खरात कोण?

चेहऱ्यामागचा चेहरा समोर! ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’मध्ये अशोक खरात कोण?

0

सोलापूर,दि.३१: महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलेल्या भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’ (Maharashtra Epstein Files) हा आगामी चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद मुख्य भूमिकेत झळकणार आहेत, तर सुबोध भावे एका राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मात्र, चित्रपटाच्या टीझरपासून प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न कायम होता – या सिनेमात कुख्यात अशोक खरातची भूमिका नेमकी कोण साकारणार? टीझरमध्ये त्याची फक्त एक झलक दाखवण्यात आली होती, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती.

अखेर या रहस्यावरून पडदा हटला असून, या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक भूमिकेत एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता झळकणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी (Manoj Joshi) हे मोठ्या पडद्यावर अशोक खरातची भूमिका साकारणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांच्या या लूक आणि भूमिकेचा अधिकृत उलगडा करण्यात आला. मनोज जोशींना या भयंकर आणि प्रभावी भूमिकेत पाहिल्यानंतर चाहतेही थक्क झाले आहेत.

सत्तेच्या पडद्याआड चालणारी घाणेरडी राजकारण, कटकारस्थाने, गुन्हेगारी आणि व्यवस्थेला पोखरणाऱ्या प्रवृत्तींचा पर्दाफाश करणारा हा बहुचर्चित चित्रपट येत्या २० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दीपाली सय्यद, सुबोध भावे, मनोज जोशी, उदय टिकेकर आणि अक्षय टंकसाळे या तगड्या स्टारकास्टमुळे या सिनेमाविषयीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.