Home महाराष्ट्र मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे लाडक्या बहिणींचा पत्ता कट; लाखो महिलांचे हप्ते...

मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे लाडक्या बहिणींचा पत्ता कट; लाखो महिलांचे हप्ते कायमचे बंद?

0
प्रतिकात्मक फोटो

मुंबई,दि.३१: राजकीय पटलावर महायुतीला तारणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) संदर्भात एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी अपडेट समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीतील फटक्यानंतर जुलै २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेला आता मोठा ब्रेक लागला आहे. राज्यातील लाखो महिलांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून, त्यांचे हप्ते आता कायमचे बंद झाले आहेत.

काय आहे नेमकं कारण?

योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि केवळ गरजू महिलांपर्यंतच मदत पोहोचवण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया (e-KYC Process) बंधनकारक केली होती. अनेक महिलांनी फॉर्म भरताना किंवा पर्याय निवडताना चुका केल्या होत्या. या चुका सुधारण्यासाठी सरकारने ३० एप्रिलपर्यंत ई-केवायसी दुरुस्तीची मुदतवाढ (e-KYC Correction Deadline) दिली होती.

परंतु, ही मुदत संपल्यानंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने सर्वांचेच डोळे पांढरे केले आहेत. लाखो महिलांनी ही प्रक्रियाच पूर्ण न केल्याने किंवा निकषांमध्ये न बसल्याने थेट अपात्रतेची कुऱ्हाड कोसळली आहे.

लाभार्थी संख्येत मोठी घसरण!

या योजनेची सुरुवात झाली तेव्हा लाभार्थी महिलांची एकूण संख्या २ कोटी ४६ लाख इतकी अवाढव्य होती. मात्र, नव्या गाळणीनंतर तब्बल ८० लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे आता पात्र महिलांचा आकडा थेट १ कोटी ६६ लाखांवर आला आहे.

या छाटणीमुळे सरकारचा महसुली खर्च नक्कीच वाचणार आहे. योजनेच्या नियमांनुसार, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी (Annual Income Below 2.5 Lakh) असणे अनिवार्य होते. ज्या कुटुंबांचे उत्पन्न यापेक्षा जास्त आढळले किंवा ज्यांनी केवायसी केली नाही, त्यांना थेट यादीतून वगळण्यात आले आहे.

हप्त्यांमध्ये फरक का?

योजनेतील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात. मात्र, ज्या महिला आधीपासूनच नमो शेतकरी महासन्मान निधी (Namo Shetkari Mahasaman Nidhi) आणि पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) या योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा केवळ ५०० रुपये दिले जातात.

मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार?

पात्र ठरलेल्या १ कोटी ६६ लाख भगिनींचे लक्ष आता चालू महिन्याच्या पैशांकडे लागले आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे रखडलेले हप्ते १३ आणि १४ मे पासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती. आज मे महिन्याचा अखेरचा दिवस असल्याने, पुढील काही दिवसांतच मे महिन्याचा हप्ता खात्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अपात्र ठरलेल्या लाखो महिलांसाठी हा मे महिना मोठा झटका देणारा ठरला आहे.


कॉपी करू नका.