दि.17: How to increase immunity: कोरोना (Covid-19) काळात काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनच्या सौम्य लक्षणांमध्ये तुमची प्रतिकारशक्ती एखाद्या औषधाप्रमाणे काम करते. खाण्यापिण्याने आणि योग्य जीवनशैलीने रोगप्रतिकारशक्ती चांगली बनवता येते. तज्ज्ञांच्या मते, चांगली झोप अनेक समस्यांवर उपाय आहे. हे केवळ अनेक रोगांपासून संरक्षण करत नाही तर शरीराला डिटॉक्सीफाई (Detoxify) करण्याचे काम करते. आयुर्वेदानुसार, चांगली झोप केवळ उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार नियंत्रणात ठेवत नाही तर चयापचय आणि प्रजनन क्षमता देखील सुधारते.
चांगली झोप रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
बहुतेक लोक रात्री उशिरापर्यंत संगणक, टीव्ही किंवा मोबाइलवर असतात. त्यामुळे त्यांच्या झोपण्याच्या पद्धतीवरही (Sleeping pattern) परिणाम होतो. यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती हळूहळू कमकुवत होते आणि लवकरच आजारी पडण्याची शक्यता वाढते. कोरोनाच्या लक्षणांमध्येही, डॉक्टर भरपूर झोपण्याचा सल्ला देतात कारण त्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो. आयुर्वेद तज्ञ डॉ दिक्षा भावसार यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये चांगल्या आणि गाढ झोपेचे अनेक फायदे सांगितले आहेत.
डॉक्टर दीक्षा यांनी लिहिले आहे की, ‘तुम्ही किती झोपता हे तुमच्या आयुष्य, आरोग्य आणि आनंदाचे थेट प्रमाण असते. आपले मन आणि शरीर बरे करण्यात आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये झोप महत्त्वाची भूमिका बजावते. झोपेपेक्षा चांगले ध्यान दुसरे काहीही असू शकत नाही. ध्यान करणे आपल्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. डॉक्टर दीक्षा सांगतात की जर झोप नसेल तर आजार बरा व्हायला वेळ लागतो. यामुळे काम करण्याची क्षमता कमी होते, पचनक्रिया बिघडते आणि तुम्हाला आराम वाटत नाही.
चांगली झोप घेण्याचे फायदे
डॉक्टर-दीक्षा सांगतात की, चांगली आणि पूर्ण झोप घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच, पण त्यामुळे स्ट्रेस हार्मोन्सही कमी होतात. चयापचय आणि प्रजनन क्षमता वाढवते. हे शरीर आतून स्वच्छ करते आणि कोलेस्ट्रॉल देखील कमी करते. एकूणच, चांगली झोप तुम्हाला प्रत्येक आजारापासून सुरक्षित ठेवते.
चांगली झोप कशी घ्यावी?
काही लोकांना पुरेशी झोप न मिळण्याची समस्या असते. अशा लोकांसाठी डॉक्टर दीक्षा यांनी काही खास टिप्स दिल्या आहेत. जसे लवकर उठण्याचा प्रयत्न करा, 30 मिनिटे उन्हात राहा, रोज प्राणायाम करा, व्यायाम करा, भरपूर पाणी प्या, रात्रीचे जेवण लवकर करा आणि हलके खा, झोपण्याच्या एक तास आधी मोबाइल-लॅपटॉप बंद करा, झोपायला जाण्याच्या अगोदर आधी प्राणायाम किंवा काहीतरी वाचण्याची सवय ठेवा.