सोलापूर,दि.१६: सोलापूर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. चाचण्यांची संख्या कमी आहे तरी रुग्ण वाढ कायम आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत लस हे मोठे हत्यार आहे. सोलापूर शहर नवीन २३४ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या ३०७५७ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २८०९६ झाली आहे.
तर ॲक्टिव्ह बाधितांची संख्या ११९६ आहे. तर आजपर्यंत मृतांची संख्या १४६५ झाली आहे. यात ९३७ पुरुष व ५२८ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज १०५१ अहवाल प्राप्त झाले. यात ८१७ निगेटिव्ह तर २३४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात १३९ पुरुष आणि ९५ महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर ११ बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

