मुंबई,दि.8:Restrictions In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases In Maharashtra) वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशीरापर्यंत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आज (शनिवारी) कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात उद्या मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
काय आहेत नियम?
रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी तर रात्री नाईट कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे.
राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.
अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध
सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना निषेध, आवश्यकता असल्यासच मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक
प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम, 50 टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही
लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी
अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी
सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी
15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद
स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद
हेअर कटिंगची दुकानं 50 टक्के क्षमतेने सुरू, रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार
पर्यटन स्थळं बंद, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे
शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू
रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री 10 ते सकाळी 5 हॉटेल बंद राहणार आहे. होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे
नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी.
नियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना निर्बंधांतून सूट. खेळाडुंना बायो बबलमध्ये राहावे लागणार. प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहता येणार नाही. दर तीन दिवसांनी खेळाडुंची करोना चाचणी करणे बंधनकारक असेल.
अम्युझमेंट पार्क, किल्ले आणि स्थानिक पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद राहतील.
शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवता येणार. मॉलमध्ये करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच परवानगी
हॉटेल्स आणि रेस्टारंटस सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत 50 टक्के क्षमतेने चालवता येणार.
महाराष्ट्रात प्रवेश करायचा असेल, तर कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी पीसीआ चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक
लसीचे दोन्ही डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्टॉरंटवर कारवाई होणार








