दि.२: Pushpa: The Rise (‘पुष्पा द राईज’) या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. बॉक्स ऑफिसवर Pushpa: The Riseने (‘पुष्पा द राईज’) कोट्यवधींची कमाई केली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याचा ‘पुष्पा द राईज'(Pushpa: The Rise) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई केली होती.
रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर ’83’ ला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक मिळत नसताना आणि कमाईची गती मंदावली असताना, अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. हिंदीशिवाय तेलुगू भाषेत रिलीज झालेल्या ‘पुष्पा द राइज’ची बॉक्स ऑफिस कलेक्शन’ची (Pushpa The Rise Box Office collection) बंपर कमाई सुरूच आहे.
‘पुष्पा द राइज’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटाने जगभरात किती कमाई केली आहे हे समोर आले आहे.
‘पुष्पा’ चित्रपटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या कमाई बाबत माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई केली करत नवा रेकॉर्ड केला आहे. भारतात चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘२०२१मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट. या चित्रपटाने जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. २०२२मध्ये देखील चित्रपट चांगली कमाई करेल अशी आशा आहे’ या आशयाची पोस्ट करण्यात आली आहे.
‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आटम सॉंग देखील केले आहे. ‘पुष्पा: द राइज’ चित्रपट २०० ते २५० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. पहिल्या आठवड्यात हा चित्रपट १४०१ स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. मात्र तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनच्या स्क्रीन्सची संख्या १६०० पर्यंत वाढवण्यात आली. ‘बॉक्स ऑफिस इंडिया’च्या रिपोर्टनुसार, ‘पुष्पा: द राइज’ने रिलीजच्या तिसऱ्या शुक्रवारी ३.२५-३.५० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने आतापर्यंत ५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.