नवी दिल्ली,दि.1: PM Kisan: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पीएम किसान सन्मान निधी ( pm kisan yojana ) अंतर्गत शेतकऱ्यांना 10 वा हप्ता जारी केला आहे. पंतप्रधानांनी पीएम किसान सन्मान निधीच्या दहाव्या हप्ताची रक्कम जमा केली आहे. यांतर्गत केंद्र सरकारने 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारकडून प्रत्येकी सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. यामध्ये दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. पीएम किसान पोर्टलनुसार या स्कीमचा पहिला हप्ता 1 डिसेंबरपासून 31 मार्चदरम्यान पाठवला जातो. तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्ताय पाठवले जातात. तर तिसरा हप्ता हा 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जातो.
PM KISAN योजनेचे लाभार्थी १० व्या हप्त्यासाठी लाभार्थी यादीत त्यांचे नाव तपासू शकतात. ही यादी pmkisan.gov.in पोर्टलवर अपलोड केली जाते. यामध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. पीएम किसान योजनेशी संबंधित कोणतीही माहिती मिळविण्यासाठी किंवा समस्या असल्यास तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक आहे. पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 आहे. याशिवाय पीएम किसान टोल फ्री क्रमांक 18001155266 आणि पीएम किसान लँडलाइन क्रमांक 011-23381092, 011-24300606 आहे.
असे तपासा यादीत आपले नाव
– http://pmkisan.gov.in वर क्लिक करा.
– वेबसाईट उघडल्यानंतर मेनूबार बघून ‘फार्मर्स कॉर्नर’ वर जा.
– लाभार्थी यादी / लाभार्थी यादी टॅबवर क्लिक करा.
– तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव तपशील प्रविष्ट करा.
– यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल.
– शासनाने या योजनेचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांची नावे राज्य/जिल्हावार/तहसील/गावनिहाय देखील पाहता येतील.
– पीएम किसान योजनेसाठी नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन करता येते. शेतकऱ्यांना हवे असल्यास, ते कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन नोंदणी करू शकतात, अन्यथा ते https://pmkisan.gov.in/ वरून ऑनलाइन नोंदणी करू शकतात.
ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी:
– https://pmkisan.gov.in/ वर जाऊन फार्मर्स कॉर्नरवर जा.
– ‘New Farmer Registration’ पर्यायावर क्लिक करा.
– त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल. तसेच, कॅप्चा कोड टाकून, राज्य निवडावे लागेल आणि त्यानंतर प्रक्रिया पुढे जावी लागेल.
– तुमच्या समोर दिसणार्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची सर्व वैयक्तिक माहिती भरावी लागेल. यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहितीही भरावी लागणार आहे.
– त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.