चंद्रपूर,दि.11: ACB ने तहसीलदाराला 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. चंद्रपूरच्या (Chandrapur) भद्रावती तहसिल कार्यालयात कार्यरत असणाऱ्या तहसीलदार डॉ. निलेश खटके यांना 25 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. (ACB caught the tehsildar red-handed while accepting a bribe of Rs 25,000)
तहसीलदार निलेश खटके (Tehsildar Nilesh Khatke) यांनी लाल मातीच्या उत्खननाच्या परवानगीसाठी 25 हजार रूपये मागितले. मात्र लाच देण्याची इच्छा नसलेल्या अर्जदाराने थेट लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे (anti corruption bureau) कार्यालय गाठले. कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सापळा रचून तहसीलदाराला रंगेहाथ पकडले. लाच घेताना सापडलेल्या तहसीलदाराचे नाव डॉ. निलेश खटके असं नाव आहे. ते भद्रावती तहसील कार्यालयात कार्यरत होते.
भद्रावती येथील अर्जदाराची वीटभट्टी आहे. वीटभट्टीसाठी लाल माती गरजेची असते. लाल मातीच्या उत्खननासाठी अर्जदाराने रितसर परवानगी मिळण्यासाठी तहसिल कार्यालयात अर्ज दाखल केला. मात्र तहसिलदार डॉ. निलेश खटके यांनी परवानगी हवी असेल तर 25 हजार रूपये द्यावे लागतील, अशी अट ठेवली.
मात्र अर्जदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्याने थेट चंद्रपूर येथील लाचलुचपत विभागाचे कार्यालय गाठले. लाचलुचपत विभागाने सापळा रचून तहसीलदाराला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कार्यवाहीने चंद्रपूर महसूल विभागात खळबळ उडाली आहे.