Home महाराष्ट्र अशोक खरात प्रकरणावर प्रणिती शिंदेंचे धक्कादायक विधान

अशोक खरात प्रकरणावर प्रणिती शिंदेंचे धक्कादायक विधान

0

सोलापूर,दि.१५: नाशिकमधील गाजलेल्या अशोक खरात प्रकरणाने आता एक भयानक वळण घेतले आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणात अत्यंत खळबळजनक संशय व्यक्त केला असून, यामुळे सत्ताधारी गोटात मोठी खळबळ उडाली आहे. “या प्रकरणातील सत्य आणि त्यामागचे मोठे चेहरे समोर येऊ नयेत म्हणून काहीही घडू शकते,” असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

नेमकी भीती काय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेल्या प्रणिती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर तोफ डागली. त्या म्हणाल्या की, अशोक खरात प्रकरण हे केवळ जमिनीच्या व्यवहारापुरते मर्यादित नाही. यात अनेक प्रभावशाली लोक आणि मंत्र्यांचे लागेबांधे आहेत. हे पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीचा ‘विशिष्ट पद्धतीने’ काटा काढला जाऊ शकतो, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

जमिनीचे व्यवहार आणि बडे अधिकारी:

सोलापूर जिल्ह्यातील जमिनींच्या खरेदी-विक्रीत मोठे गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिंदेंनी केला. यात सरकारमधील काही मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकारी यांचा थेट हात असून, लवकरच काही महत्त्वाचे पुरावे समोर येतील, असेही त्यांनी नमूद केले.

महिला सुरक्षेवरून सरकारला घेरले:

याचवेळी त्यांनी रुपाली चाकणकर यांच्या भगिनींच्या प्रकरणाचा उल्लेख करत सरकारवर टीका केली. “राज्यात महिला सुरक्षित नाहीत, मग आरक्षणाच्या गप्पा कशासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.