१ मार्चपासून नवीन नियम लागू; सिम कार्ड, LPG आणि रेल्वे प्रवासात झाले ‘हे’ मोठे बदल

0

मुंबई,दि.१: दर महिन्याच्या १ तारखेला देशात काही महत्त्वाचे आर्थिक आणि तांत्रिक बदल होत असतात. आज, १ मार्च २०२६ पासून देशभरात अनेक क्षेत्रांत १ मार्चपासून नवीन नियम (New Rules From March 1) लागू झाले आहेत. सिम कार्ड बाइंडिंगपासून ते रेल्वेच्या तिकीट बुकिंग ॲपपर्यंतच्या बदलांचा यात समावेश असून, याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि दैनंदिन व्यवहारांवर होणार आहे.

१. मोबाईल युजर्ससाठी ‘सिम बाइंडिंग’ अनिवार्य

१ मार्चपासून नवीन नियम लागू झाल्यामुळे आता मोबाईल युजर्सला अधिक सतर्क राहावे लागेल. सायबर फसवणूक रोखण्यासाठी सरकारने सिम बाइंडिंगचा नियम लागू केला आहे.

• आता व्हॉट्सॲप आणि इतर मेसेजिंग ॲप्स केवळ त्याच सिम कार्डवर चालतील जे त्या फोनमध्ये प्रत्यक्ष उपलब्ध आहेत.

• मेसेजिंग अकाऊंट सक्रिय सिम कार्डशी लिंक करणे आता बंधनकारक असेल.

२. रेल्वेचे ‘UTS’ ॲप बंद, आता ‘RailOne’ सुरू

रेल्वे प्रवाशांसाठी देखील १ मार्चपासून नवीन नियम समोर आले आहेत. रेल्वेने त्यांचे जुने ‘UTS’ ॲप आजपासून कायमचे बंद केले आहे.

• प्रवाशांना आता अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी ‘RailOne’ हे नवीन ॲप वापरावे लागेल.

• जुन्या ॲपवरून आता तिकीट बुकिंग करता येणार नाही, त्यामुळे प्रवाशांनी तातडीने नवीन ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे.

३. LPG, CNG आणि PNG च्या किमतीत बदल

दर महिन्याप्रमाणे १ मार्चपासून नवीन नियम आणि दर जाहीर करण्यात आले आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना गॅस सिलिंडरच्या किमतीत कपातीची अपेक्षा आहे.

• तेल कंपन्या आज LPG सिलिंडरचे नवीन दर जाहीर करतील.

• तसेच CNG आणि PNG च्या किमतींबाबतही सरकारकडून मोठी अपडेट येण्याची शक्यता आहे.

४. बँकिंग आणि UPI व्यवहारांसाठी कडक सुरक्षा

डिजिटल व्यवहारांमधील फसवणूक रोखण्यासाठी बँकिंग क्षेत्रात १ मार्चपासून नवीन नियम अमलात आले आहेत.

UPI पडताळणी: आता मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी केवळ UPI पिन पुरेसा नसेल, तर बँका अतिरिक्त पडताळणी (Verification) लागू करणार आहेत.

मिनिमम बॅलेन्स: खात्यातील किमान शिल्लक रकमेचा नियम आता ‘मासिक सरासरी’नुसार ग्राह्य धरला जाईल, ज्यामुळे खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here