मुंबई,दि.२३: भाजपाचे माजी खासदाराचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. काँग्रेस नेत्यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी माजी खासदारावर टीका केली आहे. राजस्थानचे माजी खासदार सुखबीर सिंह जौनापुरिया यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. व्हिडिओमध्ये जौनापुरिया एका गरजू महिलेला ब्लँकेट वाटताना दिसत आहेत, परंतु तिचे नाव आणि धार्मिक ओळख कळल्यानंतर ते ब्लँकेट परत घेतात. या घटनेमुळे लोकप्रतिनिधींच्या प्रतिष्ठेवर आणि मानवी संवेदनांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, काँग्रेस पक्षाने या प्रकरणावर टीका केली आहे, राजस्थानचे विरोधी पक्षनेते टिकाराम जूली यांनी एक निवेदन जारी केले आहे.
टोंक जिल्ह्यातील ब्लँकेट वाटप कार्यक्रमात भाजपचे माजी खासदार सुखबीर सिंह जौनापुरिया यांनी एका मुस्लिम महिलेचा अपमान केला. त्यांनी तिचा धर्म विचारला आणि नंतर ब्लँकेट परत घेतले. राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते टिकाराम जूली यांनी हा आरोप केला आहे.
या घटनेच्या एका कथित व्हिडिओचा हवाला देत ज्युली यांनी दावा केला की माजी खासदार निवाई तहसीलमधील कारेडा बुझुर्ग गावाला भेट दिली होती. ब्लँकेट वाटप करताना, एका महिलेचे नाव कळल्यानंतर त्यांनी तिला दिलेले ब्लँकेट परत घेतले. भेदभावाचा आरोप करत ज्युलीने म्हटले की, खासदारपद भूषवणाऱ्या लोकप्रतिनिधीने केलेले असे कृत्य निंदनीय आहे.
रविवारी जौनपुरिया यांनी टोंक जिल्ह्यातील भदोडी गावात ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमासाठी आजुबाजूच्या गावातून मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. काही मुस्लीम महिला देखील या कार्यक्रमाला आल्या होत्या. त्यानंतर महिलांना ब्लँकेट वाटप करण्यात आल्या.








