मुंबई,दि.१२: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील विराट सभेत गंभीर आरोप केला. मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची संयुक्त सभा पार पडली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धक्कादायक खुलासा केला. उद्योगपती गौतम अदानींना जबरदस्त फटके दिले. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालेल्या अदानींच्या श्रीमंतीच्या वेगवान प्रवासाचे धडाकेबाज प्रेझेंटेशन त्यांनी केले. ‘अवघ्या दहा वर्षांत गौतम अदानी यांच्याइतका श्रीमंत झालेला दुसरा माणूस जगात नसेल. अख्खी मुंबई, अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश अदानींना विकायला काढलेला आहे. देशात अनेक उद्योगपती असताना फक्त या एका माणसावर मेहेरबानी केली जातेय,’ असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
शिवतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी पार्क मैदानावर पार पडलेल्या या सभेमध्ये ठाकरे बंधूंच्या या युतीनं मोठ्या संख्येनं सभेसाठी आलेल्या आणि घराघरातून ही सभा शक्य त्या माध्यमातून पाहणाऱ्या जनतेला काही महत्त्वाच्या मुद्द्यांना अनुसरून संबोधित केली. जिथं राज ठाकरे यांनी देशात कशा पद्धतीनं उद्योजक गौतम अदानी यांचं महत्त्वं आणि वर्चस्व वाढत गेलं याचाही पाढा वाचला.
मुंबई व महाराष्ट्रावर संकट आल्यामुळेच आम्ही दोन भाऊ एकत्र आलो आहोत, हे सांगताना ते संकट नेमके कसले आहे याचे पुरावेच राज ठाकरे यांनी दिले. मुंबई, महाराष्ट्र व देशातील गेल्या दहा वर्षांत कशी अदानीला दिली गेली याचे सादरीकरण त्यांनी केले. ‘एकाच माणसाला सगळय़ा गोष्टी दिल्या गेल्या. वीज दिली, सिमेंट दिले. खरंतर सिमेंटच्या उद्योगात अदानी कधी नव्हतेच, आज तो देशातला दोन नंबरचा सिमेंटचा व्यापारी आहे. सगळी पोर्ट्स, विमानतळे अदानींना दिली गेली आहेत. उद्या यांनी वीज बंद केली की सगळे अंधारात जातील. सिमेंट महाग केले तर कोणी काही बोलू शकणार नाही. जाहिराती बंद होण्याच्या भीतीने मीडिया हे दाखवत नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
‘आज मी दाखवणार आहे यानंतर जर आपल्याला भीती नाही वाटली, तर या देशात निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या…’ असं म्हणत, 2014 चा काळ अधोरेखित करत नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधानपदी आले तेव्हापासून 2024 नंतर एकाएकी अदानींचं महत्त्वं नेमकं कसं आणि किती पद्धतीनं वाढत गेलं हे दाखवून देणारा भारताता एक नकाशा आणि त्यावर ठिकठिकाणी उभे राहणारे अदानींचे प्रकल्प जाहीर सभेत मांडले आणि जनतेला खडबडून जागं केलं. आपण डोळेझाक करून बसतो आणि कुठून काय सुरुय याची कल्पनाही नसते, असं म्हणत सामान्य नागरिकांपुढं राज ठाकरेंनी दाहक वास्तव मांडलं.
गौतम अदानींच्या साम्राज्याची यादी
- बिकानेर औष्णिक वीज
- बिट्टा औष्णिक वीज
- टूना बंदर
- मुंद्रा बंदर, मुंद्रा औष्णिक वीज
- दाहेज बंदर
- हाजिरा बंदर
- मर्मेगाव बंदर
- बेगुसराय औष्णिक वीज
- अरारिया औष्णिक वीज
- दरभंगा कृषी
- धामरा बंदर
- विशाखापट्टणम बंदर
- कठिहार कृषी
- पूर्णिया कृषी
- किशनगंज कृषी
- समस्तीपूर कृषी
- बनासकांठा कृषी
- असांध कृषी
- घरौंदा कृषी
- कैठल कृषी
- पिलुखेरा कृषी
- समलखान कृषी
- अरावली वीज वितरण
- भुना कृषी
- गोहाना कृषी
- राटिया कृषी
- फतेहबाद कृषी
- होडल कृषी
- पानिपत कृषी
- सफिदौं कृषी
- कठुआ कृषी
- लुधियाना लॉजिस्टीक्स पार्क
- महोबा सौर उर्जा
- कामुठी सौर उर्जा
- मलूर कृषी
- अबोहार कृषी
- धनौला कृषी
- फरीदकोट कृषी
- खनौरी कृषी
- कोटकापूरा कृषी
- मेहलकलन कृषी
- मूनक कृषी
- पटियाला कृषी
- सादिक कृषी
- कटूपल्ली बंदर
- होलेनरसीपुरा सौर उर्जा
- धामरा गॅस
- हैदराबाद एरोस्पेस
- ओब्रा वीज
- टपा कृषी
- बरिवाला कृषी
- धुरी कृषी
- गिड्डरबाहा कृषी
- खन्ना कृषी
- लुधियाना कृषी
- मेहराजवाला कृषी
- मुक्सर कृषी
- पत्रन कृषी
- समना कृषी
- भलिआना कृषी
- दिरबा कृषी
- रासखेडा कृषी
- विशाखापट्टणम डेटा सेंटर
- रासखेडा उर्जा
- अलिपूरदपूर वीज वितरण
- बारमेर वीज वितरण
- हादोती वीज विजरण
- थार वीज वितरण
- सीपत वीज वितरण
- पावागड्डा सौरउर्जा
- इलावूर कृषी
- आंबेडकरनगर कृषी उर्जा
- बदायूं कृषी
- चंदारी कृषी
- गोंडा कृषी
- लखीमपूर कृषी
- संगिला कृषी
- अहमदाबाद विमानतळ
- मंगळूर विमानतळ
- लखनौ विमानतळ
- एन्नोर बंदर
- कृष्णपट्टणम बंदर
- सुल्तानपूर कृषी
- अमेठी कृषी
- बहरैच कृषी
- धामोरा कृषी
- कन्नौज कृषी
- रायबरेली कृषी
- गंगावरम बंदर
- जम खांबालिया वीज वितरण
- नवी मुंबई विमानतळ
- मुंबई विमानतळ
- जयपूर विमानतळ
- गुवाहाची विमानतळ
- तिरुवअनंतपूरम बंदर
- विशाखापट्टणम सिमेंट
- कृष्णपट्टणम सिमेंट
- बोयारेड्डीपल्ली सिमेंट
- तलारीचेरुवू सिमेंट
- जमूल सिमेंट
- संघी सिमेंट
- नवलखी सिमेंट
- अंबुजानगर सिमेंट
- दाहेज सिमेंट
- सोलन सिमेंट
- दारलाघाट सिमेंट
- चैबासा सिमेंट
- सिंद्री सिमेंट
- कलबुर्गी सिमेंट
- बेल्लारी सिमेंट
- थोंडेभावी सिमेंट
- मंगळूरू सिमेंट
- मुतिआरा औष्णिक वीज
- घाटमपूर वीज वितरण
- मुंद्रा स्टील
- भुवनेश्वर युटिलिटी
- कैमोर सिमेंट
- अमेठा सिमेंट
- गोड्डा औष्णिक वीज
- उडुप्पी औष्णिक वीज
- कराईक्कल बंदर
- गोपालपूर सिमेंट
- असियान सिमेंट
- रोपर सिंमेंट
- भटिंडा सिमेंट
- दारला सिमेंट
- मुंढवा सिंमेंट
- राबरीयावस सिमेंट
- जोधपूर सिमेंट
- लाखेरी सिमेंट
- मड्डुकराई सिमेंट
- तुतीकोरीन सिमेंट
- कराईकल सिमेंट
- कोरबा औष्णीक वीज
- श्रावस्ती कृषी
- औरेया कृषी
- बलरामपूर कृषी
- फारुखादाबद कृषी
- कानपूर कृषी
- करुर वीज वितरण
- सीतापूर कृषी
- बांदेल कृषी
- माल्दा कृषी
- चेन्नई ग्रीन एनर्जी, गॅस, सिमेंट
- हैदराबाद ग्रीन एनर्जी, सिमेंट
- कानपूर शस्त्रास्त्र
- वरिसालीगंड सिमेंट
- गोपालपूर बंदर
- कांडला बंदर
- मस्कल सौरउर्जा
- विझिंजम बंदर
- देवापूर सिमेंट
- गणेशपहाड सिमेंट
- तांदूर सिमेंट
- मंछेरियल सिमेंट
- छत्तीसगढ उर्जा, सिमेंट
- रोपर सिमेंट
- लखनौ वीजनिर्मिती
- पेरियापटना सौरउर्जा
- कच्छ ग्रीन हायड्रोजन
- धिरौली कोळसा खाण
- अनुप्पूर औष्णिक वीज
- खावडा ग्रीन एनर्जी
- सोनप्रयाग लॉजिस्टीक्स
- भागलपूर औष्णिक वीज
- विशाखापट्टणम ग्रीन एनर्जी
- गुवाहाटी उर्जा
- फराक्का सिमेंट
- दामोदर सिमेंट
- कोलकाता सिमेंट
- संकरेल सिमेंट
- कवाई औष्णिक वीज








