जनसंघ नावाने जन्माला आलेल्या पक्षाला दुसऱ्याची पोरं भाड्यानं का घ्यावी लागतात? राज ठाकरे 

0
जनसंघ नावाने जन्माला आलेल्या पक्षाला दुसऱ्याची पोरं भाड्यानं का घ्यावी लागतात? राज ठाकरे

नाशिक,दि.१०: नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली. नाशिकच्या सर्वांगीण विकासाचा वचननामा समोर ठेवला. ‘हा वचननामा म्हणजे नुसता छापलेला रंगीत कागद नाही. ही बोगस मोदी गॅरंटी नाही. हा ठाकरेंचा शब्द आहे आणि ठाकरे जे बोलतात ते करतातच’, अशी गर्जना ठाकरे बंधूंनी यावेळी केली. 

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजपावर टीकास्त्र सोडले. १९५२ मध्ये जनसंघ नावाने जन्माला आलेल्या पक्षाला २०२६ मध्ये दुसऱ्याची पोरं भाड्यानं का घ्यावी लागतात, असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला. तुम्ही माणसं उभी केली होती ना? मग दुसऱ्याची पोरं कडेवर का घेता? तुमच्या पक्षात जी लोकं इतकी वर्षे काम करताना त्यांना डावलून पक्षात बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देता? हा त्या पक्षातील कार्यकर्त्यांचा अपमान नाही का, असा टोलाही राज ठाकरे यांनी हाणला.

महाराष्ट्रातील निवडणुका कोणत्या थराला गेल्यात, या महाराष्ट्रात ६०-७० उमेदवार सत्ताधारी पक्षातून बिनविरोध निवडून येतात. उमेदवारी अर्ज मागे घ्यायला धमक्या दिल्या जातात, पैसे वाटले जातात. कोट्यवधी रूपयांची ऑफर दिली जाते असा आरोप राज ठाकरेंनी केला. 

मनसे अध्यक्ष राज म्हणाले, कल्याण डोंबिवलीत एका प्रभागात कुटुंबातील ३ जणांना १५ कोटींची ऑफर आली. कुणाला ५ कोटी, १० कोटी दिले जातेय हे पैसे कुठून येतायेत? कुणाला उभं राहून द्यायचे नाही. धमकी द्यायची, माणसं विकत घ्यायची हे प्रकार सुरू आहे. जो पक्षात काम करतोय त्याची शून्य किंमत आहे. जी लोक पक्षात कित्येक वर्ष काम करतोय, त्याला बाजूला करून बाहेरची माणसे उभी केली जातात. तीदेखील आनंदाने येत नाहीत तर पैसे घेऊन आणली जातात. राजकारणात त्यांना पोरं होत नाहीत, म्हणून दुसऱ्यांची पोरं पळवत आहेत असा टोला त्यांनी लगावला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here