सोलापूर,दि.५: अमेरिकेबाबत खळबळजनक माहिती उघड झाली आहे. जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांचा फोन कॅाल लीक झाला आहे. फोन कॅाल लीक झाल्यानंतर खळबळजनक माहिती उघड झाली आहे. यातून युरोपियन नेत्यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील अविश्वास दिसून येत आहे. या लीक झालेल्या कॉलमध्ये जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना इशारा देत आहे.
या कॉल लीकमुळे जागतिक चर्चा सुरू झाली आहे. जर्मनीचे चांसलर फ्रेडरिक मर्ज यांनी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांना सावध केले आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला खूप सतर्क राहण्याची गरज आहे. अमेरिका खेळ करत आहेत, तुमच्यासोबत आणि आमच्यासोबतही असं मर्ज यांनी कॉलवरून सांगितले. जर्मन चांसलरचा हा फोन कॉल युरोपपासून अमेरिका, रशियापर्यंत चर्चेचा विषय बनला आहे.
या लीक झालेल्या कॉलमधील संभाषणामुळे युरोपियन नेत्यांची ट्रम्पबद्दलची असुरक्षितता आणि अविश्वास उघड झाला आहे. या लीक झालेल्या कॉलमध्ये युरोपियन नेते स्पष्टपणे सांगत आहेत की झेलेन्स्कीला ट्रम्पसोबत वाऱ्यावर सोडता येणार नाही. जर्मन चांसलरसोबतचा हा लीक झालेला फोन कॉल युरोपपासून अमेरिका आणि रशियापर्यंत चर्चेचा विषय बनला आहे.
डेर स्पीगलच्या अहवालानुसार आणि एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार युरोपीय नेत्यांनी युक्रेन- रशिया युद्ध संपवण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांवर अविश्वास व्यक्त केला. या खुलाशातून पाश्चात्य आघाडीतील वाढता तणाव स्पष्ट दिसत आहे. एका जर्मन वृत्तपत्राने म्हटले आहे की त्यांना सोमवारी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की आणि अनेक युरोपीय देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये झालेल्या कॉन्फरन्स कॉलच्या लेखी नोट्स मिळाल्या आहेत. एएफपीच्या वृत्तानुसार, जर्मन चान्सलर फ्रेडरिक मेर्झ आणि फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मॉस्कोसोबतच्या बॅक-चॅनल चर्चेत वॉशिंग्टन कीवच्या हितांचे रक्षण करेल का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.








