सुसाईड नोटमुळे मिळाला धनीवाले पिता-पुत्रांना जामीन 

0

सोलापूर,दि.१२: अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी तब्बल नऊ महिन्यापासून अटकेत असलेल्या पिता-पुत्रांना घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटने (चिठ्ठी ) न्याय मिळवून दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने रामसिंग धनीवाले व संतोष धनीवाले या पिता-पुत्रांची जामीनार मुक्तता करण्याचे आदेश दिले. (Father and sons granted bail)

हेही वाचा Solapur Heavy Rain: सोलापुरात पावसाचा कहर, ढगफुटी सदृश्य पाऊस

या प्रकरणाची हाकिकत अशी की धनीवाले पिता-पुत्रांविरुद्ध सदर अल्पवयीन मुलीने दोन केसेस दाखल केले होते. त्या केसेस काढून घेण्यासाठी धनीवाले पिता-पुत्र त्या अल्पवयीन मुलीला दमदाटी देत होते आणि त्या दमदाटीला कंटाळून ‘त्या’ अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली असा आरोप ‘त्या’ अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत केला होता.  

पोलिसांना घटनाथळाचा पंचनामा करताना त्या मुलीने लिहिलेली सुसाईड नोट (चिठ्ठी) सापडली. ती पोलिसांनी जप्त केली. पोलिसांनी धनीवाले पिता-पुत्रांना अटक केली. त्यांचा जामीन अर्ज सोलापूर सेशन्स कोर्टाने नामंजूर केल्यानंतर दोन्ही आरोपींनी ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. 

सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर झाली. जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की मयत मुलीने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये (चिठ्ठी) आरोपीच्या नावाचा उल्लेख देखील नाही. केवळ पुर्व वैमनस्यावरुन ‘तिच्या’ वडिलांनी धनीवाले पिता-पुत्रांना खोटेपणाने गुंतवले आहे. 

आत्महत्येच्या प्रकरणात छळाच्या पुरावा असणे जरुरीचे असते, सदर प्रकरणातील मयताच्या सुसाईड नोटमध्ये आरोपींच्या नावाचा उल्लेख नाही याची दखल घेऊन न्यायमुर्तींनी धनीवाले पिता पुत्रांची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने तर सरकारतर्फे ॲड. पी. पी. देवकर यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here